Shubman Gill : वयाची पंचवीशी पार होण्याआधीच शुभमन गिलचा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा भीम पराक्रम!
शुभमन गिलला दोन हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या 14 धावांची गरज होती. त्याने हा पराक्रम आजच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सलग दोन चौकार मारून आठव्या षटकात पूर्ण केला.
Shubman Gill : शुभमन गिलने वनडे क्रिकेटच्या इतिहासात कोणालाही न जमलेला भीम पराक्रम केला आहे. गिलने वनडे क्रिकेटमधील दोन हजार धावांचा टप्पा सर्वात कमी सामन्यात पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगाने हा टप्पा पार करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाच्या नावावर होता. त्याने 40 सामन्यात हा पराक्रम केला होता.
Shubman Gill - the Prince. pic.twitter.com/i4aCpF3Dqm
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 22, 2023
शुभमन गिलला दोन हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या 14 धावांची गरज होती. त्याने हा पराक्रम आजच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सलग दोन चौकार मारून आठव्या षटकात पूर्ण केला. गिलने आतापर्यंत 37 सामन्यात 2000 धावा केल्या आहेत. त्याने 6 शतके झळकावली आहेत, तर 10 अर्धशतके नावावर आहेत. त्याने द्विशतकही ठोकले आहे. गिलची वनडे क्रिकेटमध्ये 64.06 च्या सरासरीने धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट 102.09 आहे.
SHUBMAN GILL BECOMES THE FASTEST IN HISTORY TO REACH 2,000 ODI RUNS. pic.twitter.com/Yix6IyXk3f
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 22, 2023
हाशिम आमलाने 40 डावात दोन हजार धावा केल्या होत्या
हाशिम आमलाने 12 वर्षांपूर्वी भारतीय संघाविरुद्ध हा विक्रम केला होता. जानेवारी 2011 मध्ये त्याने आपल्या 41 व्या एकदिवसीय सामन्याच्या 40 व्या डावात दोन हजार धावा पूर्ण केल्या. त्यानंतर त्याने पाकिस्तानच्या झहीर अब्बासचा 28 वर्ष जुना विक्रम मोडला. अब्बासने 1983 मध्ये 45 व्या डावात दोन हजार धावा केल्या होत्या.
शुबमनचा एकदिवसीय सामन्यात विक्रम
शुभमन गिलने 2019 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, गेल्या वर्षीपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटने धावा काढण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्याने 37 सामन्यांच्या 37 डावांमध्ये 64 च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीने 1986 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेटही 102 राहिला आहे. शुबमनने आपल्या छोट्या कारकिर्दीत 6 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत.
Fastest ever to complete 2000 runs in ODI Cricket history:
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 22, 2023
Shubman Gill - 38* innings.
Hashim Amla - 40 innings.
- The Prince Shubman Gill Created History...!!!! pic.twitter.com/b5A8FCDOK9
सर्वात जलद 2000 एकदिवसीय धावा (घेण्यात आलेल्या डावाने)
- 38 - शुभमन गिल
- 40 - हाशिम आमला
- 45 - झहीर अब्बास
- 45 - केविन पीटरसन
- 45 - बाबर आझम
- 45 - व्हॅन डर दॅसन
सर्वात कमी वयात 2,000 एकदिवसीय धावा (भारतासाठी)
- 20y, 354d - सचिन तेंडुलकर
- 22y, 51d - युवराज सिंग
- 22y, 215d - विराट कोहली
- 23y, 45d - सुरेश रैना
- 24y, 44d - शुभमन गिल
इतर महत्वाच्या बातम्या