India vs England : इंग्रज भलतेच तापलेत, पण तेव्हा 5 बाद 146 वरून मॅच खेचून आणत कैफ-युवराजने ट्राॅफी जिंकून दिली होती!
युवराज 67 धावांवर बाद झाल्यानंतर कैफने तळाच्या फलंदाजांना हाती घेत विजय साकारून ऐतिहासिक विजयाची नोंद करताना नेटवेस्ट कप जिंकला होता. हा विजय सर्वोत्तम विजयापैकी एक विजय आजही समजला जातो.
लखनौ : टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये प्रथमच पहिल्यांदा टाॅस जिंकून फलंदाजी करत आहे. मात्र, टीम इंडियाची सुरुवात प्रथमच विश्वविजेत्या इंग्लंडविरुद्ध अत्यंत निराशाजनक झाली. विश्वविजेता इंग्लंड गुणतालिकेत दोन गुणांसह तळाला आहे. असे असतानाही एकही पराभव टीम इंडियाने स्वीकारला नसतानाही सुरुवात लौकिकाला साजेशी झाली नाही.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय संघाला पहिला धक्का 20 धावांवर बसला. शुभमन गिलला ख्रिस वोक्सने बाद केले. शुभमन गिलने 13 चेंडूत 9 धावा केल्या. यानंतर विराट कोहली एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीला डेव्हिड विलीने बाद केले.
चौथ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरचा खराब फॉर्म कायम राहिला. इंग्लंडविरुद्ध श्रेयस अय्यरने पुन्हा निराशा केली. श्रेयस अय्यरने 16 चेंडूत 4 धावा केल्या. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने श्रेयस अय्यरला बाद केले. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था 12व्या षटकात 3 बाद 40 अशी झाली.
टीम इंडिया अडचणीत, अन् नेटवेस्टची फायनल आठवली
टीम इंडियाची वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध कामगिरी खराब राहिली आहे. गेल्या 20 वर्षात इंग्लंडविरुद्धही भारताने विजय मिळवलेला नाही. शेवटचे 2003 मध्ये भारताने इंग्लंडला पराभूत केले होते. त्यापूर्वी सुद्धा इंग्लंड आणि भारताची लाॅर्डसवर नेटवेस्टची फायनल झाली होती. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावत 326 धावांचा डोंगर रचला होता. इंग्लंडकडून मार्कस ट्रेक्सोथिक आणि कॅप्टन नासिर हुसेनने शतकी खेळी केली होती. सव्वा तीनशे धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या टीम इंडियाने पण जोरदार हल्लाबोल करत 14.3 षटकांत 106 धावांची सलामी दिली. सेहवाग 45, तर गांगुली 60 धावांवर बाद झाला. त्यानंतर दिनेश मोंगिया, सचिन आणि द्रविड सुद्धा स्वस्तात परतल्याने टीम इंडियाची स्थिती 5 बाद 146 अशी झाली.
कैफ युवराजने नांगर टाकला
यानंतर मधल्या फळीतील युवराज सिंग आणि मोहम्मद कैफने नांगर टाकताना इंग्लंडची धुलाई केली. सहाव्या विकेटला दोघांनी 127 धावांची भागीदारी करत दोघांनी सामन्यात रंगत आणली. युवराज 67 धावांवर बाद झाल्यानंतर कैफने तळाच्या फलंदाजांना हाती घेत विजय साकारून ऐतिहासिक विजयाची नोंद करताना नेटवेस्ट कप जिंकला होता. सौरभ गांगुलीच्या नेतृत्वातील हा सर्वोत्तम विजयापैकी एक विजय आजही समजला जातो.
इतर महत्वाच्या बातम्या