एक्स्प्लोर

IND vs ENG LIVE Score : लखनौमध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात आमना-सामना, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

India vs England LIVE Score, World Cup 2023 : गतविजेता इंग्लंड विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखणार की, त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येणार याचा फैसला आज होणार आहे.

LIVE

Key Events
IND vs ENG LIVE Score : लखनौमध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात आमना-सामना, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Background

India vs England LIVE Score, World Cup 2023 : गतविजेता इंग्लंड विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखणार की, त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येणार याचा फैसला आज होणार आहे.  विश्वचषकातल्या या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडची गाठ रोहित शर्माच्या भारतीय संघाशी पडणार आहे. या दोन संघांमधला विरोधाभास म्हणजे विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. भारतानं आतापर्यंत पाचपैकी पाचही सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला पाचपैकी बांगलादेशविरुद्धचा केवळ एकमेव सामना जिंकता आला आहे. त्यामुळं भारताला हरवून विश्वचषकातलं आपलं आव्हान टिकवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न राहिल. तर रोहित शर्माचा भारतीय संघ इंग्लंडला हरवून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याचा नेटानं प्रयत्न करेल. 

मायदेशात इंग्लंडविरोधात भारताची कामगिरी England vs India Head-to-Head -

भारताने इंग्लंडविरोधात मायदेशात 51 वनडे सामने खेलले आहे. भारतीय संघाने 33 सामन्यात विजय मिळवलाय तर इंग्लंडने 17 सामन्यात भारताचा पराभव केला आहे. भारतीय संघ मायदेशात इग्लंडपेक्षा वरचढ दिसत आहे. भारताने इंग्लंडविरोधात अखेरचा वनडे सामना पुण्याच्या स्टेडिअमध्ये खेळला होता.  या सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला होता. 2021 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची मालिका झाली होती. यामध्ये भारताने 2-1 विजय मिळवला होता. 

वनडेमध्ये कुणाचे पारडे जड -  England vs India Head-to-Head in ODI

विश्वचषकात इंग्लंड सरस - England vs India Head-to-Head in ODI World Cup

1975 पासून 2019 पर्यंत वनडे विश्वचषकात भारताविरोधात इंग्लंडचे पारडे जड दिसत आहे. दोन्ही संघ विश्वचषकात आतापर्यंत 8 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये इंग्लंड संघाने चार सामन्यात विजय मिळवला आहे तर भारताला तीन सामन्यात बाजी मारता आली आहे. एक सामना बरोबरीत राहिलाय. 

कधी होणार सामना ? - 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना लखनौच्या इकाना स्टेडिअममध्ये रविवारी 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल. 

रविवारी लखनौमध्ये पावसाची शक्यता नाही -

हवामान खात्याच्या माहितीनुसार, रविवारी लखनौमध्ये तापमान 32 अंशांच्या आसपास असेल. चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पावसाची कोणताही शक्यता नाही. याशिवाय आर्द्रता 40 टक्के राहण्याचा अंदाज आहे. रविवारी लखनऊमध्ये पाऊस पडणार नाही, ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंग्लंड आणि भारताच्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल होणार आहे. भारतीय संघ सध्या 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. 

खेळपट्टी कशी ?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना लखनौच्या इकाना स्टेडियमवर होत आहे. इकाना मैदानाची खेळपट्टी फिरकीला पोषक आहे. पण विश्वचषकातील सामन्यात ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांनाही मदत करत असल्याचे दिसतेय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना जुन्याच खेळपट्टीवर होत आहे. त्यामुळे फिरकीला मदत मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 

गुणतालिकेतील दोन्ही संघाची स्थिती काय ?

जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला अतापर्यंत चांगली कामगिरी करता आली नाही. गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. इंग्लंड संघाने पाच सामन्यात फक्त दोन गुणांची कमाई केली आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया भन्नाट फॉर्मात आहे. भारताने आपल्या पहिल्या पाचही सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने इंग्लंडचा पराभव केल्यास अव्वल स्थानावर पुन्हा झेप घेणार आहे. 

हार्दिक पांड्या दोन सामन्याला उपलब्ध नाही - 

भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळं त्याला न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही खेळता येणार नाही.   हार्दिक पंड्याला दुखापतीच्या कारणास्तव न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. पुण्यातल्या भारत-बांगलादेश सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर चेंडू अडवताना त्याचा पाय मुरगळला होता. त्यामुळं हार्दिक पंड्याला सक्तीच्या विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे.  हार्दिक सध्या पंड्या पूर्ण विश्रांती घेऊन, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात सामील होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण या सामन्यासाठीही हार्दिक पांड्या उपलब्ध नाही. हार्दिक पांड्या इंग्लंड आणि श्रीलंका यांच्याविरोधात खेळणार नाही. तो दक्षिण आफ्रिकाविरोधात पाच नोव्हेंबर रोजीच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, असे वृत्त आहे. 

भारताची संभाव्य प्लेईंग 11  - 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, सूर्यकुमार यादव/ईशान किशन, अश्विन/सिराज, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव 

इंग्लंडची संभाव्या प्लेईंग 11 - 

जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), हॅरी ब्रूक, मोईन अली, क्रिस वोक्स, डेविड विली, आदिल रशीद, मार्क वुड 

21:20 PM (IST)  •  29 Oct 2023

भारताचा इंग्लंडवर 100 धावांनी विजय

भारताचा इंग्लंडवर 100 धावांनी विजय

21:15 PM (IST)  •  29 Oct 2023

इंग्लंडला नववा धक्का

इंग्लंडला नववा धक्का बसलाय. भारत विजयापासून एक पाऊल दूर

20:55 PM (IST)  •  29 Oct 2023

इंग्लंडला आठवा धक्का

इंग्लंडला आठवा धक्का... कुलदीप यादवने लियाम लिव्हिंगस्टोनला तंबूत पाठवले. लिव्हिंगस्टोन याने 27 धावांची खेळी केली. इंग्लंड 8 बाद 98 धावा. 

20:50 PM (IST)  •  29 Oct 2023

रोहित-विराटचा जल्लोष

विकेट मिळाल्यानंतर विराट-रोहितचा जल्लोष

20:52 PM (IST)  •  29 Oct 2023

जाडेजाने वोक्सचा अडथळा केला दूर

इंग्लंडला सातवा धक्का बसलाय. रविंद्र जाडेजाने वोक्सचाला केले बाद.. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget