India vs England 2nd Test Live : इंग्लंडने टॉस जिंकला, भारतीय संघात 3 मोठे बदल
India vs England 2nd Test Live : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.भारतीय संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत.
LIVE

Background
भारत आणि इंग्लंड (India vs England 2nd Test Live ) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. महत्वाचं म्हणजे पहिल्या कसोटीतही इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंगचाच निर्णय घेतला होता. भारतीय संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियाचं वेगवान अस्त्र जसप्रीत बुमराह अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. याशिवाय साईसुदर्शन आणि शार्दूल ठाकूर यांनाही बाकावर बसवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी टीम इंडियात नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलूंसह आकाश दीप यांना संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघ : यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप
#WATCH | #INDvENG | 2nd Test | Birmingham, England: A cricket fan says, "This is an important day in Indian cricket. I hope India wins this match. We are feeling the absence of senior players like Rohit Sharma, Virat Kohli...If Jasprit Bumrah plays, then there are chances of… pic.twitter.com/nNkh6FN0kp
— ANI (@ANI) July 2, 2025
Eng vs Ind : टीम इंडियाला दुसरा धक्का, करुण नायर माघारी
भारतीय संघाला उपहारापूर्वी दुसरा धक्का बसला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला करुण नायर माघारी परतला. करुण नायरने 31 धावा केल्या. कार्सने ब्रूककरवी झेलबाद करत, इंग्लंडला दुसरं यश मिळवून दिलं.
Eng vs Ind : भारताला पहिला धक्का, के एल राहुल स्वस्तात माघारी
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस वोक्सने भारताला पहिला धक्का दिला. सलामीवीर के एल राहुलला त्रिफळाचीत करुन इंग्लंडला पहिलं यश मिळवून दिलं. के एल राहुलने केवळ 2 धावा केल्या. राहुल बाद झाला तेव्हा भारताच्या 8.4 षटकात 1 बाद 15 धावा झाल्या होत्या.
























