IND vs BAN : अर्जेंटिनाच्या रंगात रंगला शाकिब अल् हसन,भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी मेस्सीची जर्सी घालून केली प्रॅक्टिस
Team India : भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून खेळणार आहे. यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत.
Shakib Wearing Messi Jersey : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ढाका येथे होणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत असून बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल् हसन (Shakib Al Hasan) एका खास लूकमध्ये प्रॅक्टिस करताना दिसला. कर्णधार शाकिबने अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू आणि कर्णधार लिओनल मेस्सीची जर्सी घालून सराव केला. नुकताच मेस्सीने संघासाठी फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) जिंकला असून संपूर्ण जगात त्याची चर्चा आहे. शाकिबही मेस्सीचा फॅन असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू मेस्सीच्या जर्सीतील शाकिबचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Shakib Al Hasan, the captain of Bangladesh 🇧🇩 test cricket team 🏏& World's no. 1 all-rounder, played some football ⚽️with compatriots during the break of training, wearing an Argentina 🇦🇷 kit of Leo Messi pic.twitter.com/oxJJSqzV3p
— ARG Soccer News ™ 🇦🇷⚽🚨 (@ARG_soccernews) December 20, 2022
भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्यानंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला चितगाव कसोटी सामना तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत भारतानं (Ind vs Ban) मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतानं सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 404 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 258 रन्स केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. ज्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात झुंज दिली पण ते केवळ 324 धावा करु शकले. ज्यामुळे भारतानं 188 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानं या मॅचमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली. ज्यानंतर आता दुसरा सामना जिकून भारत मालिकेत बांगलादेशला क्लिन स्विप देऊ शकतो.
दुसऱ्या कसोटीसाठी कसे आहेत दोन्ही संघ?
भारत - केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इश्वरन, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट
बांगलादेश -
शाकीब अल हसन (कर्णधार) , झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, मुशफिकुर रहीम, यासिर अली, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, नसुम अहमद, महमुदुल हसन खुशी, मोमिनुल हक, रजोर रहमान राजा, तस्कीन अहमद.