एक्स्प्लोर

IND vs BAN 2nd Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला 'डबल धक्का', कर्णधार रोहितसह वेगवान गोलंदाजही संघाबाहेर

Team India : भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत विजयानंतर आता दुसरा सामना 22 डिसेंबरपासून भारत खेळणार आहे.

IND vs BAN Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India tour of bangladesh) असून सध्या कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत विजयानंतर आता दुसरा सामना 22 डिसेंबरपासून भारत खेळणार आहे. पण या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला 'डबल धक्का' बसला आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकल्यानंतर आता दुसरा सामनाही खेळणार नसून त्याच्यासोबत युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep saini) हा देखील स्नायूमध्ये ताण आल्याने मालिकेबाहेर झाला आहे. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट कर ही माहिती दिली आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी कसा आहे भारतीय संघ?

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इश्वरन, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट

कसोटी मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर

भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्यानंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत भारतानं (Ind vs Ban) मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतानं सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 404 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 258 रन्स केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. ज्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात झुंज दिली पण ते केवळ 324 धावा करु शकले. ज्यामुळे भारतानं 188 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानं या मॅचमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली.

बांगलादेश संघालाही धक्का

बांगलादेशने देखील भारताविरुद्ध कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. या सामन्यात बांगलादेशलाही मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज इबादत हुसेन दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातच इबादतला दुखापत झाली होती.

असा आहे बांगलादेशचा संघ

शाकीब अल हसन (कर्णधार) , झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, मुशफिकुर रहीम, यासिर अली, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, नसुम अहमद, महमुदुल हसन खुशी, मोमिनुल हक, रजोर रहमान राजा, तस्कीन अहमद.

हे देखील वाचा-
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget