एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींचा आज मुंबई दौरा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राचं उद्घाटन, 40 वर्षांनी भारताकडे यजमानपद

भारत 40 वर्षांनंतर IOC सत्राचे यजमानपद भूषवणार आहे, PM मोदी 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत अधिवेशनाचे उद्घाटन करतील.

PM Modi Mumbai Visit Today : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज संध्याकाळी मुंबई (Mumbai News) दौऱ्यावर येतायत. संध्याकाळी 5 वाजता मोदींचं मुंबई विमानतळावर आगमन होईल. तिथून ते बीकेसीमधील जिओ वर्ल्डच्या कार्यक्रमाला जातील आणि हा कार्यक्रम आटोपल्यावर नरेंद्र मोदी पुन्हा नवी दिल्लीला रवाना होतील. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं (International Olympic Committee) अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. 

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या अधिवेशनाचं उद्घाटन करणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या सदस्यांची प्रमुख बैठक पार पडणार आहे. ऑलिम्पिक खेळांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे निर्णय आयओसी अधिवेशनामध्ये घेतले जातात. 

आशियाई स्पर्धांनंतर IOC सत्राबाबत उत्सुकता 

भारत दुसऱ्यांदा आणि सुमारे 40 वर्षांच्या कालावधीनंतर IOC सत्राचं आयोजन करत आहे. IOC चे 86 वं अधिवेशन यापूर्वी 1983 मध्ये नवी दिल्ली येथे पार पडलं होतं. हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांमध्ये आयओसीच्या सत्राबद्दल उत्सुकता असणं स्वाभाविक आहे.

क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश 

यंदाचं 141 वं IOC चं अधिवेशन भारतात आयोजित केलं जात आहे. जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि मैत्री, आदर आणि उत्कृष्टतेच्या ऑलिम्पिक आदर्शांना पुढे नेण्यासाठी राष्ट्राच्या समर्पणाचं प्रतीक आहे. या सत्रात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आणि IOC चे इतर सदस्य, भारतीय ऑलिम्पिक संघटनेसह विविध क्रीडा महासंघांचे प्रमुख भारतीय क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि इतर काही प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

आयओसी अॅथलीट्स कमिशनचे सदस्य आणि भारताचा आघाडीचा नेमबाज अभिनव बिंद्रा यासंदर्भात म्हणाला की, आयओसी सत्र भारतातील तरुणांना ऑलिम्पिक चळवळ अधिक जवळून समजून घेण्यास मदत करू शकतं. ऑलिम्पिक चळवळ खरोखरंच भारतातील तरुणांना चॅम्पियन बनण्यासाठी प्रेरित करू शकते. तरुण समाजाला नवी दिशा देण्यासाठीही सकारात्मक भूमिका बजावू शकतात. मुंबईतील आयओसी अधिवेशनात ऑलिम्पिकशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, ज्यात भविष्यातील ऑलिम्पिक खेळ, खेळांचा समावेश आणि वगळण्याशी संबंधित निर्णयांचा समावेश आहे.

दरम्यान, भारतात होणारं IOC चं 141 वं सत्र जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी, खेळातील उत्कृष्टता साजरी करण्यासाठी आणि मैत्री, आदर आणि ऑलिम्पिकच्या आदर्शांना पुढे नेण्यासाठी देशाच्या समर्पणाचं प्रतीक आहे. हे सत्र खेळाशी संबंधित सर्व भागधारकांमध्ये संवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी देईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 12 May 2024Pankaja Munde On Politics : काहींना वाटतं अभद्र बोलणं म्हजणे चांगलं...पंकजा मुंडेंचा रोख कुणारवर?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
Embed widget