एक्स्प्लोर
Advertisement
भारतामुळे श्रीलंकन खेळाडूंचा पाकिस्तानात येण्यास नकार, पाकिस्तानी मंत्र्याचा दावा
मागील 10 वर्षांपासून जगभरातील कोणताही क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर घेलेला नाही. 27 सप्टेंबर रोजी श्रीलंकन क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होता. परंतु त्यापूर्वी श्रीलंकेच्या संघातील 10 प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे.
इस्लामाबाद : मागील 10 वर्षांपासून जगभरातील कोणताही क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर घेलेला नाही. 27 सप्टेंबर रोजी श्रीलंकन क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होता. परंतु त्यापूर्वी श्रीलंकेच्या संघातील 10 प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. पाकिस्तानचे क्रीडामंत्री फवाद चौधरी यांनी या घटनेचं खापर भारतावर फोडलं आहे.
फवाद चौधरी यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भारताने श्रीलंकन खेळाडूंना धमकी दिली आहे, जर तुम्ही पाकिस्तानमध्ये गेलात तर तुम्हाला आयपीएलमध्ये खेळू देणार नाही. चौधरी म्हणाले की, एका क्रीडा कॉमेंटेटरने मला सांगितले आहे की, भारताने श्रीलंकन खेळाडूंना पाकिस्तानात न जाण्याची धमकी दिली आहे. तसे केल्यास त्यांचा आयपीएलमधला करार संपवून टाकू, असेही भारताने सांगितले आहे.
पाकिस्तानच्या आरोपांनंतर श्रीलंकेने पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. श्रीलंकेतील मंत्री हरिन फर्नांडो यांनी फवाद हुसैन चौधरींच्या ट्वीटला उत्तर दिले आहे. त्यामध्ये फर्नांडो म्हणाले की, याचा भारताशी काहीही संबंध नाही. 2009 मधील घटनेमुळे आमचे अनेक खेळाडू पाकिस्तानात जाऊ इच्छित नाहीत. सुरक्षेच्या कारणावरुन त्यांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. आम्हीदेखील खेळाडूंच्या या मताचा सन्मान करत इतर खेळाडूंना (ज्या खेळाडुंची इच्छा आहे...)पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्यासाठी आज ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे संघांची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या दहा दिग्गज खेळाडूंनी याआधीच या दौऱ्यातून माघार घेतल्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने नव्या शिलेदारांसह वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी संघ जाहीर केला आहे. डावखुरा फलंदाज लाहिरु थिरीमन्नेकडे वन डे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर ट्वेन्टी ट्वेन्टी संघाची कमान दसुन शनाकाकडे देण्यात आली आहे. या दौऱ्यातला पहिला वन डे सामना कराचीत 27 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.
या खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला
श्रीलंकन एकदिवसीय संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने, टी-20 संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा, माजी कर्णधार अँजेलो मैथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल या खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement