एक्स्प्लोर
भारतीय गोलंदाजांचा प्रभावी मारा, इंग्लंडची घसरगुंडी
![भारतीय गोलंदाजांचा प्रभावी मारा, इंग्लंडची घसरगुंडी India England Second Test England Slip To 1035 In Reply To Indias 455 भारतीय गोलंदाजांचा प्रभावी मारा, इंग्लंडची घसरगुंडी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/18182330/Team_India.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
विशाखापट्टणम : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसावरही टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. विशाखापट्टणमधील कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढे इंग्लंडची पाच बाद 103 अशी घसरगुंडी झाली.
टीम इंडियाने आदल्या दिवशीच्या चार बाद 317 धावांवरुन सर्व बाद 455 धावांची मजल मारली. मग दुसऱ्या दिवसअखेर भारताने इंग्लंडची पाच बाद 103 अशी अवस्था करुन या कसोटीवर पकड मजबूत केली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्टो प्रत्येकी बारा धावांवर खेळत होते. भारताकडून आर. अश्विनने दोन, तर शमी आणि जयंत यादवने प्रत्येकी एक विकेट काढली. इंग्लंडकडून ज्यो रुटने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)