एक्स्प्लोर

Year Ender 2017 : टीम इंडियाने स्वतःचाच विक्रम मोडत इतिहास रचला

भारताने 2017 या वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 53 सामने खेळले, ज्यापैकी 37 सामन्यांमध्ये विजय मिळवला, जे एका वर्षातील भारतीय संघाचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे.

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत विजय मिळवत टीम इंडियाने नवा विक्रम केला. भारताने 2017 या वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 53 सामने खेळले, ज्यापैकी 37 सामन्यांमध्ये विजय मिळवला, जे एका वर्षातील भारतीय संघाचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. एका वर्षात सर्वाधिक विजय (38) मिळवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. भारताने 2017 मध्ये 11 कसोटी सामने खेळले, ज्यापैकी सात सामन्यात विजय मिळाला, तर एकात पराभव आणि दोन सामने अनिर्णित राहिले. या वर्षात खेळलेल्या 29 पैकी 21 सामन्यात भारताला विजय मिळवता आला. सात सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, तर एक सामना अनिर्णित राहिला. 2017 मध्ये खेळलेल्या 13 पैकी 9 टी-20 सामन्यात विजय मिळाला, तर 4 मध्ये पराभव मिळाला. भारताच्या विजयाच्या दृष्टीने हे एका वर्षातील सर्वोत्कष्ट प्रदर्शन आहे. यापूर्वी 2016 मध्ये भारताने 46 पैकी 31 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. गेल्या वर्षी भारताने 9 कसोटी, 7 वन डे आणि 15 टी-20 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. एका वर्षात सर्वाधिक वन डे सामने जिंकण्याचा विक्रम भारताने 1998 मध्ये केला होता. तेव्हा भारताने एकाच वर्षात 24 सामने जिंकले होते. एका वर्षातील भारताच्या विजयाचं रेकॉर्ड पाहिलं तर, 2010 आणि 2013 मध्ये 29-29, तर 2007 मध्ये 28 सामने जिंकले. भारताने 1998 मध्ये 26 सामने जिंकले होते, जो टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीचा मोठा विक्रम होता. एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्टेलियाने 2003 मध्ये 47 पैकी 38 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (1995 मध्ये 35 विजय), पाकिस्तान (2011 मध्ये 34 विजय), ऑस्ट्रेलिया (2007 आणि 2009 मध्ये 33 विजय) आणि श्रीलंका (2014 मध्ये 33 विजय) यांचा नंबर लागतो. भारत सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. भारताने यंदा कसोटीतही सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. एका वर्षात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या (1984) नावावर आहे. त्यानंतर इंग्लंड (2014) आणि दक्षिण आफ्रिका (2008) यांचा क्रमांक लागतो. या तिन्ही संघांनी प्रत्येकी 11 सामने जिंकले होते. ऑस्ट्रेलियाने 2002, 2004 आणि 2006 मध्ये 10-10 सामने जिंकले होते. भारताचा 9 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम आहे, जो 2016 मध्ये करण्यात आला होता. एका वर्षात सर्वाधिक वन डे सामने जिंकण्याचा विक्रमही ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने 2003 मध्ये 30 वन डे सामने जिंकून हा विक्रम केला होता. तर टी-20 मध्ये एका वर्षात सर्वाधिक सामने (2016 मध्ये 15 सामने) जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तान (2016 मध्ये 11 सामने) आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने 2010 मध्ये दहा सामने जिंकले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan IND vs SL : जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
Devdutt Padikkal Century IND vs SL : श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
IND vs SL : सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
Shadab Khan Picks Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget