Asia Cup Hockey 2022 : पराभवाचा वचपा काढला, भारताचा जपानवर 2-1 ने विजय
India vs Japan Asia Cup Hockey 2022 : हॉकी आशिया कप स्पर्धेत भारताने जपानचा पराभव करत वचपा काढलाय. सुपर 4 लढतीत भारताने जपानचा 2-1 च्या फरकाने पराभव केला.
India vs Japan Asia Cup Hockey 2022 : हॉकी आशिया कप स्पर्धेत भारताने जपानचा पराभव करत वचपा काढलाय. सुपर 4 लढतीत भारताने जपानचा 2-1 च्या फरकाने पराभव केला. या विजयासह भारताने साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढलाय. मनजीतने आठवड्या मिनिटाला आणि पवन राजभर याने 35 व्या भारतासाठी गोल केलेय...साखळी फेरीत जपाने भारताचा 5-2 च्या फरकाने पराभव केला होता. हाच हिशोब भारतीय संघाने पूर्ण केलाय.
Asia Cup Hockey 2022: India beat Japan 2-1 in Super-4s Pool match. Manjeet and Pawan Rajbhar score for India.
— ANI (@ANI) May 28, 2022
भारतीय संघाने यंदा युवा संघ उतरवण्याचा निर्णय घेतलाय. चमूतील तब्बल दहा खेळाडू नवखे आहेत. या दहा खेळाडूंनी आतापर्यंत कधीही सिनिअर भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. युवा खेळाडूंना अनुभव यावा, यासाठी हा निर्णय घेतला.
भारतीय संघाची साखळी फेरीतील कामगिरी -
हॉकी आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने सलामीचा सामना बरोबरीत सोडला.. पाकिस्तान आणि भारतामध्ये अटीतटीची लढत झाली. हा सामना अनिर्णत राहिला. पण दुसऱ्या सामन्यात जपानने भारताचा पराभव केला. जपानकडून पराभव झाल्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान खडतर झाले होते. पण भारतीय संघाने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. मोक्याच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी आपली कामगिरी उंचावली. भारताने इंडोनेशियाचा 16-0 च्या फरकाने दारुण पराभव करत सुपर 4 फेरी गाठली आहे.
दोन गटात स्पर्धा -
हॉकी आशिया कप स्पर्धेत दोन गट करण्यात आले होते. अ गटामध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत जपान आणि यजमान इंडोनेशिया संघ होता. तर ब गटामध्ये मलेशिया, दक्षिण कोरिया, ओमान आणि बांग्लादेश हे संघ होते. सुपर 4 मध्ये जपान, भारत,दक्षिण कोरिया आणि मलयेशियाने एन्ट्री केली आहे. या चार संघातील दोन संघामध्ये फायनल होणार आहे.