एक्स्प्लोर

Ind vs Zim 2nd T20: आज पुन्हा रंगणार भारत विरुद्ध झिम्बाब्वेचा टी-20 सामना; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?

Ind vs Zim 2nd T20: आज भारत आणि झिम्बाब्वेचा यांच्यात दुसरा टी-20 सामना रंगणार आहे.

Ind vs Zim 2nd T20: टी-20 विश्वविजेत्या भारतीय संघाला झिम्बाब्वेने 13 धावांनी (Ind vs Zim) पराभूत केले. या विजयासह झिम्बाब्वेने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करताना झिम्बाब्वेने भारतापुढे 116 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र भारतीय संघ 102 धावांवर सर्वबाद झाला.

टी 20 विश्वचषकाच्या विजयानंतर भारतीय संघ हरारे स्पोर्टर्स क्लबमध्ये पहिली मॅच खेळत होता. मुझरबनी आणि चटारानं शेवटच्या दोन ओव्हरमध्ये केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताला 13 धावांनी पराभूत केलं. वॉशिंग्टनं सुंदरनं 27 धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. झिम्बॉब्वे विरुद्ध शुभमन गिल आणि वॉशिंग्टनं सुंदर शिवाय इतर फलंदाज चांगली खेळी करण्यात अपयश आलं.

आज भारत आणि झिम्बाब्वेचा यांच्यात दुसरा टी-20 सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 4.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाचा पहिल्या टी-20 सामन्यात पराभव झाला असला तरी दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पुनरागमन करेल, अशी आशा आहे. तसेच भारतीय संघात दुसऱ्या टी-20 साठी कोणताही बदल न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघ आज कोणत्या रणनिती घेऊन मैदानात उतरणार आणि पराभवाचा वचपा काढणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सामना कसा राहिला?

झिम्बाब्वेने भारतापुढे 116 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. अभिषेक शर्माला खातंही उघडता आलं नाही, तो शून्यावर बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी आलेल्या ऋतुराज गायकवाड देखील झटपट बाद झाला. ऋतुराज गायकवाडने 7 धावा केल्या. भारतीय संघाकडून पदार्पण करणाऱ्या रियान परागलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. रियान परागने फक्त 2 धावा केल्या. रिंकु सिंह देखील शून्यावर बाद झाला. कर्णधार शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही अपयश आले. शुभमन गिल 31 धावा करत बाद झाला, तर ध्रुव जुरेलने 6 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिंकदर राजाने 3 विकेट् घेतल्या. 

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संपूर्ण संघ:

शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, रिंकु सिंह, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, रवी बिश्नोई, साई सुदर्शन, जितेश शर्मा, तुषार देशपांडे, हर्षित राणा

India vs Zimbabwe चे वेळापत्रक-

पहिली टी-20 - 6 जुलै, हरारे- झिम्बाब्वेचा विजय
दुसरी टी-20 - 7 जुलै, हरारे
तिसरी टी-20 - 10 जुलै, हरारे
चौथी टी-20 - 13 जुलै, हरारे
पाचवी टी-20- 14 जुलै, हरारे

संबंधित बातम्या:

Team India Celebration: झाडावर चढलेल्या चाहत्याला पाहून रोहित शर्मा अन् विराट कोहलीने काय केलं?; व्हिडीओची तुफान चर्चा

घरी गेल्यानंतर हार्दिक पांड्याने मेडल कोणाला दिले?; अखेर फोटो आला समोर, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

1983, 2007, 2011 साली विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाला BCCI कडून किती रुपये मिळाले?, पाहा A टू Z माहिती

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 5th T20 : 3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
IND vs NZ 5th T20I : सेफर्ट-फिलिप्सच्या वादळात टीम इंडियाची दाणादाण! 12 चेंडू राखून न्यूझीलंडचा विजय, पाचव्या टी-20 सामन्यात नेमकं काय घडलं?
सेफर्ट-फिलिप्सच्या वादळात टीम इंडियाची दाणादाण! 12 चेंडू राखून न्यूझीलंडचा विजय, पाचव्या टी-20 सामन्यात नेमकं काय घडलं?
Hong Kong Sixes : भारत, पाकिस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका राहिली बाजूला; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन अफगाणिस्तान चॅम्पियन, सगळ्यात मोठी उलथापालथ
भारत, पाकिस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका राहिली बाजूला; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन अफगाणिस्तान चॅम्पियन, सगळ्यात मोठी उलथापालथ
IND vs NZ मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! हॉर्न वाजवत आजोबांनी थेट मैदानात गाडी घुसवली, टीम इंडियाचे खेळाडू चक्रावले; सामना थांबला अन्...
IND vs NZ मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! हॉर्न वाजवत आजोबांनी थेट मैदानात गाडी घुसवली, टीम इंडियाचे खेळाडू चक्रावले; सामना थांबला अन्...

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget