Mohammed Siraj Record : मोहम्मद सिराजच्या दमदार स्पेलने श्रीनाथ आणि इशांत शर्माला मागे टाकले; कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम
Mohammed Siraj Record : सिराजच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 धावांवर गारद झाला. सिराजने सर्वाधिक 6 बळी घेतले. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी 2 यश मिळाले.
Mohammed Siraj Record : केपटाऊन कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने 9 षटकात 15 धावा देत 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. सिराजने पहिल्याच सत्रात 5 बळी घेत इतिहास रचला. याशिवाय आणखी अनेक विक्रम आपल्या नावावर केले. जसप्रीत बुमराहने भारताकडून कसोटी सामन्यात सर्वात कमी धावा देत 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. जसप्रीत बुमराहने 2019 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 7 धावांत 5 फलंदाज बाद केले होते.
South Africa - 55 all out.
— Johns. (@CricCrazyJohns) January 3, 2024
- Lowest score by an opposition against India in Test history. pic.twitter.com/iA7F2WGvKX
मोहम्मद सिराजने विशेष यादीत स्थान मिळवले
मोहम्मद सिराज या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. केपटाऊनमध्ये सिराजने 15 धावांत 6 खेळाडू बाद केले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यानंतर भारताचा माजी दिग्गज जवागल श्रीनाथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. जवागल श्रीनाथ यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 21 धावांत 6 बळी घेतले. हा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1996 साली खेळला गेला होता.
SOUTH AFRICA 55 ALL-OUT.
— Johns. (@CricCrazyJohns) January 3, 2024
Losing the first Test by innings & 32 runs to bossing South Africa in the first Day of 2nd Test. 🔥💪 pic.twitter.com/V1yGMdOGfe
या दिग्गजांचा यादीत समावेश
बांगलादेशविरुद्ध इशांत शर्माने 22 धावांत 5 बळी घेतले. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना 2019 मध्ये कोलकाता येथे झाला होता. याशिवाय मदन लाल यांनी 1981 साली इंग्लंडविरुद्ध 23 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना 1981 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता. त्याचवेळी केपटाऊनमध्ये मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 धावांवर गारद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 6 बळी घेतले. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी 2 यश मिळाले.
Mohammed Siraj has bowled 9 consecutive overs in the new ball spell.
— Johns. (@CricCrazyJohns) January 3, 2024
9-3-15-6 💥💪 pic.twitter.com/LRdkiOVqRD
इतर महत्वाच्या बातम्या