Rohit Sharma: भारताच्या राष्ट्रगीतादरम्यान कर्णधार रोहित शर्मा भावूक; डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडिओ
Rohit Sharma: मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी-20 विश्वचषकातील महामुकाबला खेळला जातोय.
Rohit Sharma: मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी-20 विश्वचषकातील महामुकाबला खेळला जातोय. दोन्ही संघ सुपर-12 टप्प्यात आमने-सामने आले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) हा संस्मरणीय क्षण आहे. रोहित शर्मा पहिल्यांदाच विश्वचषकात भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. ज्यावेळी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारताचं राष्ट्रगीत (Indian Anthem) वाजलं, तेव्हा रोहित शर्मा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याच्या आधी जेव्हा दोन्ही संघाचं राष्ट्रगीत सुरू होतं, तेव्हा मेलबर्न क्रिकेट स्टेडियममधील एक लाखांहून अधिक प्रेक्षकांसमोर खेळाडू उभे होते. जेव्हा भारताचे राष्ट्रगीत सुरू झालं, तेव्हा संपूर्ण स्टेडियमधील प्रेक्षक आपपल्या जागेवर उभे झाले. त्यावेळी भारतीय संघाचे सर्व खेळाडू देशाचं राष्ट्रगीत म्हणत होते. राष्ट्रीत संपणार इतक्यात कॅमेरा रोहित शर्मावर गेला. त्यावेळी रोहितच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळालं.
व्हिडिओ-
Goosebumps guaranteed
— crickaddict45 (@crickaddict45) October 23, 2022
National anthem 🇮🇳🔊#RohitSharma𓃵 #INDvPAK pic.twitter.com/jleC83jqN8
संघ
भारताची प्लेईंग इलेव्हन:
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन:
बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
2021च्या विश्वचषकातील बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात
दरम्यान, 2021 च्या विश्वचषकात भारताला पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं भारताला 10 विकेट्सनं पराभूत केलं. पहिल्यांदाच पाकिस्तानच्या संघानं भारताला टी-20 विश्वचषकात पराभूत केलं. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या संघाला विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध संघर्ष करावा लागला. मात्र, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या जोडीनं अनेक वर्षांचा दुष्काळ संपवला. या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरला आहे.
हे देखील वाचा-