CWG 2022, table tennis Semi-Final: भारतीय पुरुष संघाचा नायजेरीयावर विजय, अंतिम सामन्यात एन्ट्रीसह पदकही निश्चित
CWG 2022: भारताने टेबल टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये नायजेरीयाला 3-0 ने मात देत फायनलमध्ये जागा मिळवली आहे. आता भारताचा सुवर्णपदकासाठी सिंगापूरविरुद्ध सामना होणार आहे.
Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडूंनी आणखी एक पदक निश्चित केलं आहे. हे पदक भारताने टेबल टेनिस खेळाच्या पुरुष टीमच्या स्पर्धेत निश्चित केलं आहे. भारताने नायजेरीवर (India vs Nigeria) विजय मिळवत फायलनमध्ये एन्ट्री मिळवली आहे. ज्यामुळे भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झालं आहे. भारताने नायजेरीयाला 3-0 ने मात दिल्यानंतर आता फायनलमध्ये भारत सिंगापूरविरुद्ध (India vs Singapore) मैदानात उतरणार आहे.
FINAL BOUND! 🏓
— SAI Media (@Media_SAI) August 1, 2022
Our Men's #TableTennis team have made it to the final of #CWG2022 following a hard-fought 3-0 win against Nigeria in Semis 🔥@HarmeetDesai /@sathiyantt (MD), @sharathkamal1 (MS) & Sathiyan (MS) have sealed the victory for 🇮🇳
Up against 🇸🇬 in FINAL on 3rd Aug pic.twitter.com/5ioyX781vQ
भारत आणि नायजेरीय यांच्यातील सामन्यात सर्वात आधी हरमीत देसाई आणि साथियान ज्ञानसेकरन या भारतीय जोडीने बोडे अबियोदुन आणि ओलाजिदे ओमोटायो यांच्यावर 11ृ6, 11ृ7 आणि 11-7 असा सोपा विजय मिळवला. या विजयासह त्यांनी भारताला 1ृ0 अशी आघाडी मिळवून दिली. नंतर दुसऱ्या सामन्यात भारताचा अनुभवी खेळाडू अचंता शरथ कमलने नायजेरियाच्या अरुणा क्वाद्रीचा 3-1 असा पराभव करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. नंतर तिसऱ्या सामन्यात साथियान ज्ञानसेकरनने ओलाजीदे ओमोटायो विरुद्ध 11-9, 4-11, 11-6, 11-8 असा विजय मिळवत सामना जिंकलाच सोबत भारताला नायजेरियावर 3-0 असा विजय मिळवून दिला. भारताने या विजयासह अंतिम फेरी गाठली जिथे भारताचा सामना सिंगापूरशी होईल.
भारताची पदकसंख्या 9
हरजिंदरनं मिळवलेल्या कांस्य पदकामुळे भारताची पदकसंख्या नऊवर गेली आहे. काही वेळापूर्वीच सुशीला देवीने ज्युदोमध्ये रौप्य मिळवलं असून विजयकुमारनेही कांस्य पदक मिळवलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 8 वर गेली होती. याआधी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू, अचिंता शेउली, जेरेमी लालरिनुंगा यांनी सुवर्णपदक जिंकलं असून संकेत सरगर आणि बिंद्याराणी देवी यांनी रौप्य पदक मिळवलं आहे. तसंच गुरुराजा पुजारी यानेही कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. याशिवाय लॉन बाऊल्समध्येही भारतीय महिलांचा ग्रुपने फायनलमध्ये पोहोचल्याने किमान रौप्यपदक भारताने निश्चित केलं आहे. तर बॅडमिंटन संघानंतर आता टेबल टेनिसमध्येही फायनलमध्ये ध़डक घेत भारताने किमान रौप्यपदक निश्चित केलं आहे. या पदकांसह भारताच्या खात्यावर 12 पदकं झाली असून ही तीन पदकं सुवर्ण असतील की रौप्य हे पाहावं लागेल.
हे देखील वाचा-