एक्स्प्लोर

'जास्त ड्रामा करु नका', नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पीचवरील टीकेनंतर अश्विनचा संताप अनावर

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पीचवर अनेकांनी टीका केली. टीम इंडियाचा गोलंदाज आर अश्विन चांगलाच संतापला आहे. अश्विननं म्हटलंय की, पीचवर टीका करणं बंद करायला हवं. पीचवरुन जास्त ड्रामा करु नये, अशा शब्दात त्यानं टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

IND Vs ENG: इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पीचवर अनेकांनी टीका केली. यावरुन टीम इंडियाचा गोलंदाज आर अश्विन चांगलाच संतापला आहे. अश्विननं म्हटलंय की, पीचवर टीका करणं बंद करायला हवं. पीचवरुन जास्त ड्रामा करु नये, अशा शब्दात त्यानं टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

अश्विननं म्हटलं आहे की, चांगलं क्रिकेट पीच कशी असते? गोलंदाजांचा दिवस होता. रन बनवण्यासाठी फलंदाजांनी चांगली कामगिरी करणं आवश्यक होतं. त्यामुळं पीचबाबत प्रश्नच येत नाही. चांगली पीच कशी बनवतात? त्याची नेमकी व्याख्या काय? पहिल्या दिवशी चेंडू सीम करेल आणि शेवटच्या दोन दिवसांमध्ये स्पीन होईल. असे नियम कोण बनवतं? असा सवाल त्यानं केला आहे. या चर्चा इथंच थांबवायला हव्यात आणि यावरुन अधिकचा ड्रामा बंद केला पाहिजे, असं अश्विननं म्हटलं आहे.

IND Vs ENG: चौथ्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' स्टार खेळाडू संघाबाहेर

तिसऱ्या कसोटी दरम्यान अश्विननं आपल्या कसोटी क्रिकेटमधील 400 विकेट्स पूर्ण केल्या. अश्विननं या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिकिट मिळवण्यासाठी चौथा सामना जिंकण किंवा अनिर्णित ठेवणं भारतीय संघाला आवश्यक आहे.

ICC World Test Championship: भारत पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी, फायनलमध्ये पोहोचण्यासाठी काय करावं लागेल?

तिसऱ्या कसोटीत शानदार विजयासह टीम इंडियाची आघाडी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हा कसोटी सामना दुसर्‍याच दिवशी संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहास दोन दिवसांत सामन्याचा निकाल येण्याची कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही 22वी वेळ आहे. विशेष म्हणजे, यामध्ये इंग्लंडचा 13 वेळा सहभाग होता. या 13 सामन्यात इंग्लंडचा चार वेळा पराभव झाला आहे.

या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 112 धावा केल्या. यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 145 धावा करू शकला. अशाप्रकारे पहिल्या डावात भारताने 33 धावांची आघाडी मिळवली होती. यानंतर इंग्लंडचा संघ दुसर्‍या डावात 81 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताला 49 धावांचे लक्ष्य मिळाले, जे भारतीय संघाने कोणत्याही विकेट न गमावता 7.4 षटकांत पूर्ण केले.

अक्षर पटेल भारतीय संघाच्या विजयाचा हीरो भारताच्या या शानदार विजयाचा अक्षर पटेल नायक ठरला. आपला दुसरी कसोटी सामना खेळताना अक्षर पटेलने या कसोटीच्या दोन्ही डावात पाच विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने 38 धावा देऊन सहा विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावात त्याने 32 धावा देऊन पाच बळी घेतले. यासह, तो दिवस-रात्र कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
IND vs SL 1st Test : लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी
लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget