एक्स्प्लोर

WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!

WTC Points Table Update after IND vs SL 1st Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवत आपल्या मोहिमेला सुरुवात केली.

WTC Points Table update after IND vs SL 1st Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवत आपल्या मोहिमेला सुरुवात केली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने सामन्यात सुरुवातीपासूनच आपली पकड कायम ठेवली. काही टप्प्यांवर श्रीलंकेने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र निर्णायक क्षणी भारतीय गोलंदाजांनी पुन्हा जोरदार कमबॅक करत सामना आपल्या बाजूने खेचून आणला. या विजयाचा थेट फायदा भारताच्या डब्ल्यूटीसी गुणतालिकेतील पीसीटीला झाला आहे. भारताचा पीसीटी 48.15 वरून थेट 53.33 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या विजय मिळूनही डब्ल्यूटीसी क्रमवारीत भारताच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. भारत अजूनही पाचव्या स्थानावरच आहे. यामागे बांगलादेशचा विजय हे प्रमुख कारण आहे.

भारताचे गुण 52 वरून 64 वर...

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर डब्ल्यूटीसीच्या या चक्रात भारताने आतापर्यंत एकूण 10 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या विजयापूर्वी भारताच्या खात्यात 52 गुण होते. कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताला 12 गुण मिळाले आणि त्यामुळे संघाचे एकूण गुण 64 वर पोहोचले आहेत. या विजयामुळे भारताचा पीसीटी देखील मोठ्या प्रमाणात वाढला. सामन्यापूर्वी भारताचा पीसीटी 48.15 टक्के होता. आता तो वाढून 53.33 टक्के झाला आहे. म्हणजेच भारताच्या पीसीटीमध्ये तब्बल 5.18 टक्क्यांची वाढ झाली आहे.

श्रीलंकेला मोठा धक्का, पीसीटी घसरला

दुसरीकडे, भारताकडून पराभव झाल्यामुळे श्रीलंकेच्या पीसीटीमध्ये मोठी घसरण झाली आहे. या डब्ल्यूटीसी चक्रात श्रीलंकेने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताविरुद्धच्या पराभवामुळे श्रीलंकेच्या गुणांमध्ये कोणतीही भर पडलेली नाही. संघाच्या खात्यात यापूर्वी असलेले 20 गुण कायम आहेत. मात्र, सामन्याच्या निकालामुळे पीसीटीवर मोठा परिणाम झाला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रीलंकेचा पीसीटी 41.67 टक्के होता. आता तो घसरून 33.33 टक्क्यांवर आला आहे. तरीदेखील श्रीलंकेला क्रमवारीत फार मोठा धक्का बसलेला नाही. संघ अजूनही सहाव्या स्थानावर कायम आहे.

विजय मिळूनही भारत पाचव्या स्थानावरच का?

हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताने सामना जिंकला, 12 गुण मिळवले आणि पीसीटीमध्येही मोठी वाढ झाली. मग क्रमवारीत भारताला वरचे स्थान का मिळाले नाही? याचे कारण बांगलादेश आहे. बांगलादेशने नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवला. या विजयामुळे बांगलादेशचा पीसीटी वाढून 66.67 टक्के झाला आहे. भारताचा पीसीटी सध्या 53.33 टक्के आहे. त्यामुळे बांगलादेशचा पीसीटी भारतापेक्षा अधिक असल्याने भारताला पाचव्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे.  

श्रीलंकेची घसरण

श्रीलंकेच्या पीसीटीमध्ये 41.67 वरून 33.33 टक्क्यांपर्यंत घसरण झाली असली, तरी त्यांचे सहावे स्थान कायम आहे. यामागे इंग्लंडचा कमी पीसीटी कारणीभूत आहे. इंग्लंडचा पीसीटी सध्या 24.36 टक्के आहे. त्यामुळे श्रीलंकेचा पीसीटी घसरूनही तो इंग्लंडपेक्षा अधिक आहे. त्यामुळे श्रीलंका सहाव्या स्थानावर कायम आहे आणि इंग्लंड त्याच्या मागे आहे.

हे ही वाचा -

IND vs SL 1st Test : लंकेत टीम इंडियाचे शक्तिप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
IND vs SL 1st Test : लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी
लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी
IND vs SL 1st Test DAY-5 : गॉलमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय; श्रीलंकेला धूळ चारत मालिकेत घेतली आघाडी
गॉलमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय; श्रीलंकेला धूळ चारत मालिकेत घेतली आघाडी
Eng Vs Pak 1st Test : पाकिस्तानचा संघ बकवास, इंग्लंड 3-0 जिंकणार...; मालिका सुरू होण्याआधीच स्टुअर्ट ब्रॉडची भविष्यवाणी, संपूर्ण पाक टीमची लायकी काढली, नको नको ते बोलला
पाकिस्तानचा संघ बकवास, इंग्लंड 3-0 जिंकणार...; मालिका सुरू होण्याआधीच स्टुअर्ट ब्रॉडची भविष्यवाणी, संपूर्ण पाक टीमची लायकी काढली, नको नको ते बोलला
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Embed widget