IND vs ENG : "यशस्वी" द्विशतकानंतर बुमराहसमोर इंग्रजांनी सपशेल गुडघे टेकले; टीम इंडिया भक्कम स्थितीत!
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते. बुमराहने इंग्लंडच्या 6 फलंदाजांना बाद केले. याशिवाय कुलदीप यादवने 3 बळी घेतले. अक्सर पटेलने एक विकेट घेतली.
IND vs ENG 2nd Test : विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाला 143 धावांची आघाडी मिळाली. जसप्रीत बुमराहच्या (sprit Bumrah) गोलंदाजीसमोर इंग्रजांनी सपशेल गुडघे टेकले. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते. बुमराहने इंग्लंडच्या 6 फलंदाजांना बाद केले. याशिवाय कुलदीप यादवने 3 बळी घेतले. अक्सर पटेलने एक विकेट घेतली. टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा बिनबाद 28 अशी मजल मारली आहे. यशस्वी 15 आणि रोहित 13 धावांवर खेळत आहे. टीम इंडियाकडे 171 धावांची आघाडी असल्याने विजय आवश्यक असलेल्या कसोटीवर पकड मिळवली आहे.
BUMRAH DESERVES A SEPRATE AWARD FOR THIS MENTAL YORKER...!!! 🤯🔥pic.twitter.com/mtkf3D5E6s
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 3, 2024
जसप्रीत बुमराहसमोर इंग्लिश फलंदाजांनी गुडघे टेकले
याआधी भारताचा डाव 396 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. बेन डकेटने 21 धावा केल्या. यानंतर 114 धावांच्या स्कोअरवर दुसरा धक्का बसला. जॅक क्रॉली 76 धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला. जॅक क्रॉलीनंतर इतर फलंदाज क्रमाने पॅव्हेलियनमध्ये परतले.
Jasprit Bumrah on the Vizag pitch which barely helped him.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 3, 2024
6/45 with the wickets of Root, Pope, Stokes, Bairstow, Hartley and Anderson. Bumrah is just lethal everywhere in the world. 🫡 pic.twitter.com/KKSq59Ki6O
जॅक क्रॉलीने शानदार खेळी खेळली, पण...
इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. यानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने 47 धावांची खेळी केली. मात्र उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. इंग्लिश फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. ऑली पोप, जॉनी बेअरस्टो आणि बेन फॉक्ससारखे फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले.
BUMRAH BAMBOOZLED STOKES...!!! 🥶
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 3, 2024
- The reaction of Stokes says it all.pic.twitter.com/ZhhqXxvh83
भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या
याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 396 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 209 धावा केल्या. मात्र याशिवाय भारताच्या एकाही फलंदाजाला पन्नास धावांचा टप्पा गाठता आला नाही. इंग्लंडकडून जिमी अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. हैदराबाद कसोटीचा नायक टॉम हार्टलीला 1 यश मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या