एक्स्प्लोर

IND vs BAN Test Series : पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली, बुमराह आणि पंतचे पुनरागमन, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी

IND vs BAN Test Series : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये.

Indian team for the first test against Bangladesh : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने  भारतीय संघ जाहीर केला आहे. वेगवान गोलंदाज यश दयालचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. शिवाय जसप्रीत बुमराह, विराट कोहली आणि ऋषभ पंतने संघात पुनरागमन केले आहे. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आलेली नाही, त्याची पहिल्या कसोटीसाठी निवड झाली आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी संघाची निवड अद्याप झालेली नाही

निवड समितीने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताच्या 16 खेळाडूंची निवड केली आहे. भारतीय संघाला 27  सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी संघाची निवड अद्याप झालेली नाही. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेशिवाय भारत आणि बांगलादेशमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी अद्याप संघाची निवड झालेली नाही.

पहिल्या कसोटीसाठी BCCI ने 16 खेळाडूंची घोषणा

चेन्नई येथे खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी BCCI ने 16 खेळाडूंची घोषणा केली आहे. यष्टिरक्षक ऋषभ पंत, केएल राहुल आणि सरफराज खान यांनाही या संघात संधी मिळाली आहे. तर श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळालेले नाही. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी निवड करण्यात आलेल्या 16 खेळाडूंमध्ये  चार फिरकीपटू आणि चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. दोन यष्टिरक्षकांसह एकूण आठ फलंदाज आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल पहिल्यांदाच भारतीय संघात सामील झाला आहे. तो आयपीएल 2024 मध्ये आरसीबीकडून खेळला होता.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया-

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल , शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल

इतर महत्वाच्या बातम्या 

IPL 2025 च्या हंगामात मोठ्या घडामोडी, पाच संघांचे कॅप्टन बदलणार, शुभमन गिल ते डुप्लेसिस यादीत आणखी कोण असणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 PM 16 September 2024 : ABP MajhaRaj Thackeray Special Report : Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात राज ठाकरे सक्रिय?Sanjay Gaikwad Special Report : गायकवाड, शिरसाट ते पडळकर; बेताल वक्तव्यांचं राजकारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Ganesh Visarjan 2024 : मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Embed widget