IND vs AUS U19 World Cup Final LIVE Score : फायनलचा दबाव घेतलाच; अंडर -19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे वाघ ढेपाळले, ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
254 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची फलंदाजी अडखळली सलामीवीर अर्शिन कुलकर्णी अवघ्या तीन धावांवर तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर टीम इंडियाला तगडा हादरा बसला.
IND vs AUS U19 World Cup Final LIVE Score : गेल्यावर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकमध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने धुवाँधार कामगिरी करत अंतिम फेरीमध्ये धडक दिली होती. मात्र, अंतिम फेरीमध्ये कचखाऊ फलंदाजीमुळे वर्ल्डकप गमवावा लागला होता. त्यामुळे पुन्हा एकदा आता अंडर-19 वर्ल्डकपच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाचा बदला घेणार का? अशी चर्चा ज्यूनिअर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर सुरू झाली होती. मात्र सिनिअर टीम इंडियाची जी अवस्था वरिष्ठ ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झाली तीच अवस्था ज्युनियर टीम इंडियाची अवस्था आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली आहे. 25 व्या षटकांत टीम इंडियाचे पाच फलंदाज बाद झाले आहेत.
254 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची फलंदाजी अडखळली सलामीवीर अर्शिन कुलकर्णी अवघ्या तीन धावांवर तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर टीम इंडियाला तगडा हादरा बसला. त्यानंतर आलेल्या मुशीर खानने सावध खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला एक जीवदान मिळून सुद्धा मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो अवघ्या 22 धावांवरती बाद झाला. त्यानंतर आलेला कॅप्टन उदय सहारन आणि बीडचा हुकमी एका सचिन धसही लागोपाठ झाल्याने टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. आता पूर्णपणे टीम इंडियाची मदार सलामीवीर आदर्श सिंहवर असून त्याने एक बाजू लावून धरली आहे. मधल्या फळीतील फलंदाज कशी खेळी करतात यावर आता टीम इंडिया सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकणार की नाही? अवलंबून असेल.
ऑस्ट्रेलियाच्या धारदार माऱ्यासमोर टीम इंडियाचे फलंदाज अडखळताना दिसून आले. अचूक मारा आणि अचूक टप्प्यावरील गोलंदाजी हे ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडले. त्यामुळे टीम इंडियाने सुरुवातीपासून सावध खेळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पहिला दहा षटकांमध्ये टीम इंडियाच्या अवघ्या 26 धावा होऊ शकल्या. नंतरच्या दहा शतकामध्ये टीम इंडियाने गिअर अप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीन विकेट गमावल्याने टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. त्यामुळे आता टीम इंडिया हे आव्हान पार करते का? हे आता पाहावं लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या