एक्स्प्लोर
IND vs AUS 4th test : पुजाराचं द्विशतक थोडक्यात हुकलं
त विरुद्ध ऑस्ट्रेलियामधल्या चौथ्या कसोटी सामन्यावर भारताने चांगलीच पकड मिळवली आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस चेतेश्वर पुजाराने गाजवला. परंतु पुजाराला द्विशतकानं हुलकावणी दिली.
सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधल्या चौथ्या कसोटी सामन्यावर भारताने चांगलीच पकड मिळवली आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस चेतेश्वर पुजाराने गाजवला. परंतु पुजाराला द्विशतकानं हुलकावणी दिली. पुजाराने 373 चेंडूत 22 चौकारांच्या सहाय्याने 193 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने पुजाराला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद करत त्याची खेळी संपुष्टात आणली.
ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीदेखील भारताच्या फलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व गाजवले. दरम्यान भारताने आतापर्यंत 6 बाद 458 धावांचा डोंगर उभा केला आहे. ऋषभ पंत (71) आणि रवींद्र जडेजा (13) धावांवर खेळत आहेत.
9 hours, 8 minutes and 373 balls later - @cheteshwar1 walks back after scoring 193 ???????????? #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/atOD7TeAOD
— BCCI (@BCCI) January 4, 2019
Meanwhile, Rishabh Pant gets to his half century - his first this tour #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/BMvblWsSW4
— BCCI (@BCCI) January 4, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement