एक्स्प्लोर
Advertisement
भारतासमोर डकवर्थ लुईसनुसार 11 षटकात 90 धावांचं आव्हान
भुवनेश्वर कुमार आणि खलिल अहमदनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडत ऑस्ट्रेलियन फलंदाजीला सुरुंग लावला.
मेलबर्न : मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या दुसऱ्या टी-20 तही पावसानं व्यत्य़य आणला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियानं 19 षटकांत सात बाद 132 धावांची मजल मारली होती.
मात्र डकवर्थ लुईस पद्धतीनुसार टीम इंडियाला आता 11 षटकांत 90 धावांचं सुधारीत लक्ष्य देण्यात आलं. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कांगारुंवर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं.
भुवनेश्वर कुमार आणि खलिल अहमदनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडत ऑस्ट्रेलियन फलंदाजीला सुरुंग लावला. त्यानंतर जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव आणि कृणाल पंड्यानंही प्रत्येकी एक विकेट घेत आपली जबाबदारी चोख बजावली.
ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉटनं सर्वाधिक नाबाद 32 धावांचं योगदान दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement