(Source: Matrize)
Ind vs Aus 1st Test : टीम इंडियात पुन्हा बदल, 'हा' अचानक भारतात परतला; BCCIने घाईघाईने घेतला मोठा निर्णय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला सुरू होण्यासाठी आता दोन दिवस उरले आहेत.
Ind vs Aus 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला सुरू होण्यासाठी आता दोन दिवस उरले आहेत. पहिला कसोटी सामना शुक्रवारपूर्वी पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या मालिकेचा निकाल ठरवेल की यंदाच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कोणता संघ खेळणार आहे.
दरम्यान, भारतीय संघाचे संकट काही कमी होत नाही. संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झला आहे. त्यामुळे टीम इंडियात पुन्हा बदल करण्यात आला आहे, त्यांच्या जागी यश दयालला ऑस्ट्रेलियाला पाठवले जात आहे. संघाच्या राखीव गोलंदाजात खलील अहमदचा समावेश होता, आता त्याच्या जागी यश दयालचा समावेश करण्यात आला आहे. दोघेही डावखुरे गोलंदाज आहेत.
बांगलादेश मालिकेदरम्यान कसोटी संघात स्थान मिळालेले यश दयाल दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघासोबत होता, मात्र एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. आता तो दक्षिण आफ्रिकेतून तो थेट ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे पोहोचला आहे. खलील जखमी झाल्याने नेटमध्ये गोलंदाजी करू शकला नाही. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. दयालला भारत अ संघाकडून कसोटी सामने खेळायचे होते, पण त्याला भारतीय टी-20 संघासोबत दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यात आले.
खलीलला लवकरच तेथून भारतात पाठवले जाईल. आयपीएल लिलावापूर्वी खलील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा खेळणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. दिल्ली कॅपिटल्सने त्याला सोडले आहे. तर यश दयालला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कायम ठेवले आहे. ही कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी संघात उपलब्ध होणार नाही. या कसोटीसाठी जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्यात आले आहे. शुभमन गिलही पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाचा समावेश होणार?
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.
हे ही वाचा -
Ind vs Aus 1st Test : गिल खेळणार की नाही 22 तारखेला ठरणार, पण 'या' पठ्ठ्याचा पर्थ कसोटीत डेब्यू फिक्स; कोचने केला खुलासा!