एक्स्प्लोर
Advertisement
ICC World Cup 2019 | नाणेफेक जिंकून न्यूझीलंडची फलंदाजी, शमी आजही संघाबाहेर
या सामन्यात मोहम्मद शमीला वगळलं असून भुवनेश्वर कुमारला संघात स्थान मिळालं आहे. तर कुलदीप यादवच्या जागी युजुवेंद्र चहलला संधी मिळाली आहे.
मॅन्चेस्टर : विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मोहम्मद शमीला वगळलं असून भुवनेश्वर कुमारला संघात स्थान मिळालं आहे. तर कुलदीप यादवच्या जागी युजुवेंद्र चहलला संधी मिळाली आहे.
दोन्ही संघ या उपांत्य सामन्यात एक एक बदलासह मैदानात उतरली आहे. या सामन्यात फिरकीपटू युजुवेंद्र चहलचं संघात पुनरागमन झालं आहे. कुलदीप यादवच्या जागी युजुवेंज्र चहलला संघात स्थान मिळालं आहे. तर मागील सामन्याप्रमाणेच आजच्या सामन्यातही मोहम्मद शमीचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश झालेला नाही.
तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने आपल्या संघात बदल करत लॉकी फर्ग्युसनला संधी दिली आहे. लॉकी या विश्वचषकातील न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 17 विकेट्स घेतल्या आहेत. टिम साऊदीच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, युजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा
न्यूझीलंड संघ : मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल, केन विल्यमसन, रॉस टेलर, टॉम लॅथम, जेम्स नशीम, कोलिन डी ग्रॅण्डहोम, मिशेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, ट्रेन्स बोल्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement