एक्स्प्लोर
आयसीसीची कसोटी क्रमवारी जाहीर, टीम इंडिया अव्वल स्थानी कायम
श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियानं आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. तर सलामीवीर लोकेश राहुलनं कसोटी कारकीर्दीत फलंदाजांच्या यादीत पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबई : श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियानं आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. तर सलामीवीर लोकेश राहुलनं कसोटी कारकीर्दीत फलंदाजांच्या यादीत पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे.
श्रीलंकेविरूद्धची मालिका 3-0 अशी निर्विवादपणे जिंकल्यावर भारताच्या खात्यात दोन गुणांची वाढ झाली असून 125 अंकासह भारत अव्वल स्थानी कायम आहे. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका 110 अंकांसह दुसऱ्या स्थानावर तर 105 अंकांसह इंग्लंड तिसऱ्या स्थानी आहे.
फलंदाजांच्या यादीत लोकेश राहुल टॉप टेन मध्ये!
भारताचा धडाकेबाज सलामीवीर लोकेश राहुलनं या मालिकेत दोन अर्धशतकं झळकावताना कसोटीमध्ये सलग 7 अर्धशतकं झळकावण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे या मालिकेआधी फलंदाजांच्या यादीत 11व्या स्थानावर असलेल्या राहुलनं आता 9व्या स्थानावर उडी घेतली आहे. या कामगिरीबरोबरच राहुलनं त्याच्या कसोटी कारकीर्दीत सर्वोत्तम स्थान गाठलं आहे.
राहुलसोबत टॉप टेनमध्ये फलंदाजांच्या यादीत भारताच्या चेतेश्वर पुजारा (4), विराट कोहली (5) आणि अजिंक्य रहाणे (10) यांचा समावेश आहे. राहुलचा जोडीदार शिखर धवननंही शानदार कामगिरीच्या जोरावर 38व्या स्थानावरून 28 व्या स्थानावर झेप घेतली आहे. धवननं या मालिकेत दोन शतकांसह 358 धावा फटकावून मालिकाविराचा बहुमान मिळवला होता. फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ अव्वल स्थानी आहे.
गोलंदाज कुठल्या स्थानावर?
गोलंदाजांच्या यादीत रविंद्र जाडेजा पहिल्या स्थानावर तर रविचंद्रन अश्विन तिसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत मात्र रविंद्र जाडेजाला आपलं अव्वल स्थान गमवावं लागलं आहे. कोलंबो कसोटीत झालेल्या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे रविंद्र जाडेजाला कॅण्डी कसोटीला मुकावं लागलं होतं. त्यामुळे त्याच्या खात्यातील दोन गुण कमी होउन 429 अंकांसह तो दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या या यादीत बांग्लादेशचा शाकीब अल हसन आता 431 अंकांसह पहिल्या स्थानावर आहे.
आयसीसी टॉप 3 कसोटी संघ-
1) भारत
2) दक्षिण आफ्रिका
3) इंग्लंड
आयसीसी टॉप 3 कसोटी फलंदाज-
1) स्टीव्ह स्मिथ - ऑस्ट्रेलिया
2) जो रूट - इंग्लंड
3) केन विलियम्सन - न्यूझीलंड
आयसीसी टॉप 3 कसोटी गोलंदाज-
1) रविंद्र जाडेजा - भारत
2) जेम्स एंडरसन - इंग्लंड
3) रविचंद्रन अश्विन - भारत
आयसीसी टॉप 3 कसोटी अष्टपैलू-
1) शाकीब अल हसन - बांग्लादेश
2) रविंद्र जाडेजा - भारत
3) रविचंद्रन अश्विन - भारत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement