(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC Test Ranking : विराट कोहलीला मागे टाकत जो रुट अव्वलस्थानी; जसप्रीत बुमराहला टॉप 10 मध्ये स्थान
ICC T20I Rankings : आयसीसीने क्रमवारी जाहीर केली असून टी-20 क्रिकेटमध्ये भारताच्या विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विन यांनी टॉप टेन मध्ये आपले स्थान कायम ठेवलं आहे
ICC T20I Rankings : भारताविरुद्ध नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये 173 धावा करणाऱ्या जो रुटने आयसीसी क्रमवारीत आपले टॉप टेन मधील स्थान कायम ठेवलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला क्रमावारीत मागे टाकले आहे. या यादीत जो रुट चौथ्या क्रमांकावर असून विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजांच्या यादीत इंग्लंड विरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे पहिल्या कसोटी सामन्यात 9 विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला फायदा झाला आहे. जसप्रीत बुमराह टेस्ट गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेन मध्ये स्थान मिळवले आहे. जसप्रीत बुमराह नवव्या स्थानावर आहे.
तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मालिकेत गोलंदाडी आणि फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बांगलादेशचा शाकिब अल अल हसन टी २० इंटरनॅशनलमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे.
पहिल्या क्रमांकावर केन विल्यमसन
आयसीसीने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ आणि मार्नस लाबुशेन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. तर जो रुट चौथ्या आणि कोहली पाचव्या क्रमांकावर आहे.
आर. अश्विन दुसऱ्या क्रमांकावर
भारताच ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदांज कमिन्सने पहिले स्थान कायम ठेवलं आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साउथी आणि चौथ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड आहे. भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात गोलांदाजीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या जेम्स अॅन्डरसनला याचा फायदा झाला आहे. जेम्स सातव्या क्रमांकावर तर स्टुअर्ड ब्रॉड आठव्या स्थानी आहे.
संबंधित बातम्या :
Cricket for Olympics: 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता, आयसीसी दावा सादर करणार