NZ vs AFG: अफगाणिस्तानचा पराभव, टीम इंडियाचं पॅकअप; न्यूझीलंडची सेमीफायनलमध्ये धडक
ICC T20 WC 2021: अबुधाबीच्या शेख जायद स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात आफगाणस्तानच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अफगाणिस्तानचा हा निर्णय फसला.
ICC T20 WC 2021, NZ vs AFG: टी-20 विश्वचषकातील 40 व्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं अफगाणिस्तानच्या संघाला धुळ चाखली. अबुधाबीच्या शेख जायद स्डेडिअमवर (Sheikh Zayed Stadium) खेळण्यात आलेल्या सामन्यात आफगाणस्तानच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अफगाणिस्तानचा हा निर्णय फसला. अफगाणिस्तानच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 124 धावापर्यंत मजल मारता आली. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं अफगाणिस्तानवर 8 विकेट्स राखून विजय मिळवलाय. न्यूझीलंडच्या विजयामुळं भारताचं उपांत्य फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलंय. तर, या विजयासह न्यूझीलंडच्या संघाने उपांत्य फेरीत धडक दिलीय.
नाणेफेक जिंकून अफगाणिस्ताकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हजरतुल्ला जजई (4 बॉल 2 धावा), मोहम्मद शहजाद (11 बॉल 4 धावा), रहमानउल्ला गुरबाज (9 बॉल 6 धावा), नजीबुल्ला जद्रान (48 बॉल 73 धावा), गुलबदिन नायब (18 बॉल 15), मोहम्मद नबी (20 बॉल 14), करीम जनात (2 बॉल 2 धावा), रशीद खान (7 बॉल 3 धावा) आणि मुजीब उर रहमान 1 बॉल 0 धाव केली. ज्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 124 धावापर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडच्या संघाकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर, टीम साऊथीला दोन आणि अॅडम मिल्ने, मिचेल सँटनर आणि ईश सोडी यांना प्रत्येकी एक- एक विकेट्स मिळाली.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडच्या संघाकडून मार्टिन गुप्टिल (23 बॉल 28 धावा), डॅरिल मिशेल (12 बॉल 17 धावा), केन विल्यमसन संयमी खेळी करत नाबाद 40 धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे 32 बॉलमध्ये 36 धावा ठोकल्या. यामुळे न्यूझीलंडच्या संघाला 8 विकेट्सने विजय मिळवता आलाय. अफगाणिस्ताकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खानला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
राशिद खानचे 400 विकेट्स
आबुधाबीच्या मैदानावर खेळण्यात आलेल्या सामन्यात राशिद खाननं त्याच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टीलला माघारी धाडत इतिहास रचलाय. या विकेट्सह राशीद खाननं टी-20 क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. रशीद टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचलाय. या यादीत वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो अव्वल स्थानी आहे.