AFG Vs NZ: न्यूझीलंडसमोर मोठं आव्हान, अफगाणिस्तानच्या आक्रमक गोलंदाजाचं संघात पुनरागमन
अफगाणिस्तान- न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या सामन्यावर भारताची नजर आहे. या सामन्याच्या निकाल भारताचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग दर्शवणार आहे.
Afghanistan Vs New Zealand: टी-20 विश्वचषकाच्या गट मधील महत्वाचा सामना अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात आज अबुधाबीच्या शेख जायद स्डेडिअमवर (Sheikh Zayed Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजचा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघानं त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केलाय. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या स्टार फिरकीपटू मुजीब उर रहमानचे (Mujeeb Ur Rahman) अफगाणिस्तानच्या संघात पुनरागमन झालंय
नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार नबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यानं मुजीबचं संघात पनरागमन झाल्याचे सांगितलं. तसेच हा सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यानं म्हटलंय. मुजीब हा गेल्या 15 वर्षांपासून अफगाणिस्तानचा प्रमुख गोलंदाज आहे. अफगाणिस्तानसाठी तो सर्वोत्तम इकॉनॉमी रेट (5.96) असलेला गोलंदाज ठरलाय. मुजीबने मागील 5 सामन्यात 11 विकेट्स पटकावलेत. यामुळे मुजीब न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी बजावून दाखवू शकतो, अशी अपेक्षा केली जातेय.
अफगाणिस्तान- न्यूझीलंड सामन्याचा निकाल भारतासाठी महत्वाचा
अफगाणिस्तान- न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या सामन्यावर भारताची नजर आहे. या सामन्याच्या निकाल भारताचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग दर्शवणार आहे. दरम्यान, अफगाणिस्तानकडून न्यूझीलंडचा पराभव झाल्यास भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा वाढतील. मात्र, या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत केल्यास भारताच्या अडचणी वाढू शकतात. या विजयानंतर अफगाणिस्तानचे 6 गुण होतील. त्यानंतर भारताचा शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध होणार आहे. नामिबियाविरुद्ध विजय मिळवल्यास भारताचेही 6 गुण होतील. दरम्यान, रन रेटच्या जोरावर एका यांपैकी एका संघाला उपांत्य फेरीत प्रवेश दिला जाईल.
अफगाणिस्तान- हजरतुल्ला झाझाई, मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), रहमानउल्ला गुरबाज, गुलबदिन नायब, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनात, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, हमीद हसन.
न्यूझीलंड- मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, ईश सोधी, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट.
हे देखील वाचा-