एक्स्प्लोर

World Cup 2019 : पाकिस्तानचा बांगलादेशवर 94 धावांनी विजय, परंतु स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आज (शुक्रवारी) झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर 94 धावांनी मात करुन, विश्वचषकाच्या नवव्या सामन्यात पाचवा विजय साजरा केला.

लंडन : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आज (शुक्रवारी) झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर 94 धावांनी मात करुन, विश्वचषकाच्या नवव्या सामन्यात पाचवा विजय साजरा केला. या विजयाने पाकिस्तानला गुणतालिकेत न्यूझीलंडसोबत 11-11 गुणांची बरोबरीही साधून दिली. परंतु या सामन्यात नेट रनरेटचं समीकरण राखण्यात अपयश आल्याने पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी या सामन्यात बांगलादेशला अवघ्या सहा धावांमध्ये रोखणे आवश्यक होते. परंतु बांगलादेशने सहा धावांचा टप्पा सहज ओलांडून 221 धावांची मजल मारली. त्यामुळे पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. त्याआधी पाकिस्ताननं 50 षटकांत नऊ बाद 315 धावांची मजल मारली होती. पाकिस्तानने दिलेल्या 316 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशला केवळ 221 धावांपर्यंतच मजल मारली. बांग्लादेशच्या शकीब अल हसनने (77 चेंडूत 66 धावा) काही काळ सामन्यात बांगलादेशला जीवंत ठेवले होते. परंतु त्याला मोठी खेळी उभारता आली नाही. हसन व्यतिरिक्त बांगलादेशच्या कोणत्याही फलंदाजाला पाकिस्तानी गोलंदाजांनी फार वेळ मैदानात टिकू दिले नाही. त्यामुळे हा सामना पाकिस्तानने सहज जिंकला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 9.1 षटकात 35 धावांच्या बदल्यात 6 बळी मिळवले. तर शादाब खानने 2 बळी मिळवले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा सलामीवीर फाखर जमान ( 13) स्वस्तात माघारी परतला. परंतु त्यानंतर इमाम-उल-हक आणि बाबर आझम यांनी 157 धावांची भागीदारी करून पाकिस्तानसाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. बाबरने 98 चेंडूंत 96 धावा केल्या. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने 474 धावा केल्या आहेत. इमामने (100 चेंडूत 100) शतकी खेळी केली. त्यानंतर इमाम वासीमने 26 चेंडूत 43 धावांची खेळी करत पाकिस्तानला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला. गुणतालिका

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan IND vs SL : जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
Devdutt Padikkal Century IND vs SL : श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
IND vs SL : सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
Shadab Khan Picks Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget