एक्स्प्लोर
...तरच चौथ्या कसोटीत खेळेन : विराट कोहली
मुंबई : "जर मी 100 टक्के फिट असेन तरच खेळेन," असं स्पष्टीकरण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दिलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहली बोलत होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रांचीमधील कसोटी सामन्यात विराटच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे धरमशालामधील निर्णायक कसोटीत विराट कोहलीऐवजी मुंबईकर श्रेयस अय्यरचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विराट कोहली चौथ्या कसोटीत खेळण्याविषयी साशंकता
सगळ्यांना सारखाच नियम
"मी इतरांपेक्षा वेगळा नाही. संघातील इतर खेळाडूंना लागू होणारा नियम मलाही लागू होतो. कोणालाही स्पेशल ट्रीटमेंट नाही. त्यामुळे जर मी 100 टक्के फिट असेन तरच चौथ्या कसोटीत खेळेन," असं विराटने सांगितलं.
विराटला 'सॉरी'ची स्पेलिंगही येत नसेल : जेम्स सदरलँड
रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्या डावात क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात परतला नाही. भारतीय कर्णधारानं ती दुखापत बाळगूनच रांची कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी केली. पण दुसऱ्या डावात त्याने क्षेत्ररक्षण केलं होतं. कोहली वि. ऑस्ट्रेलियन मीडिया : विराटच्या समर्थनार्थ बिग बी मैदानात धरमशालामध्ये गुरुवारी सरावादरम्यान विराट कोहली मैदानावर तर दिसला पण त्याने नेटमध्ये बॅटिंगची प्रॅक्टिस केली नाही. सरावादरम्यान तो वॉर्म अप करतानाच दिसला. यावेळी त्याच्या खांद्याला पट्टी बांधलेली होती. संध्याकाळ होता होता समजलं की, दुखापतग्रस्त विराटच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यरला कव्हर बॅट्समन म्हणून धरमशालामध्ये बोलावण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाकडून विराट कोहलीची डोनाल्ड ट्रम्प यांच्यांशी तुलना यंग वीरु म्हणून श्रेयसची ओळख! मुंबईचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर त्याच्या साथीदारांमध्ये यंग वीरु नावाने ओळखला जातो. 22 वर्षीय अय्यरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात नाबाद दुहेरी शकत ठोकलं होतं. त्यामुळे तो भारतीय संघात निवडीसाठी मजबूत दावेदार बनला होता. 55.18 च्या सरासरीने धावा ठोकणाऱ्या या फलंदाजानेप्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. डाईव्ह मारताना कोहलीला दुखापत, मैदानातून बाहेरI will play only if I am 100 percent fit, says Captain @imVkohli on the eve of the fourth Test against Australia #INDvAUS pic.twitter.com/u2Y0UqDhOp
— BCCI (@BCCI) March 24, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement