Hockey World Cup 2023: उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्रीसाठी भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
Hockey World Cup 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत उत्तम फॉर्ममध्ये दिसत असून भारताने यंदाच्या विश्वचषकात अद्याप एकही सामना गमावलेला नाही.
India vs New Zealand Hockey World Cup 2023 Live Streaming : हॉकी विश्वचषक (Hockey World Cup 2023) स्पर्धेत भारतीय हॉकी संघ (Team India) दमदार कामगिरी करताना दिसत आहे. आतापर्यंत भारताने स्पर्धेत तीन सामने खेळले असून त्यातील दोघांमध्ये विजय मिळवला आहे, तर एक सामना भारताचा 0-0 असा बरोबरीत सुटला. दरम्यान आता भारताचा पुढील सामना जो स्पर्धेतील क्रॉसओव्हर सामना आहे तो न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) खेळवला जाणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास भारत उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळवू शकणार आहे.
भारताने सलामीचा सामना स्पेन संघाविरुद्ध (India vs Spain) 2-0 ने जिंकल्यावर इंग्लंडविरुद्धचा (India vs England) भारताचा सामना 0-0 अनिर्णित सुटला आहे. ज्यानंतर वेल्सविरुद्ध भारत एक मोठा विजय मिळवले असं वाटत होतं. कारण वेल्सने सलामीचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने गमावले होते. पण भारताविरुद्ध त्यांनी कडवी झुंज दिली. पण अखेर 3-2 च्या फरकाने भारत जिंकला. दरम्यान ग्रुप डी मध्ये भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तीन सामन्यात दोन विजयासह टीम इंडियानं सात गुणांची कमाई केली आहे. इंग्लंडचा संघ डी ग्रुपमध्ये आघाडीवर आहे. इंग्लंडकडेही सात गुण असले तरी त्यांनी मोठ्या फरकाने वेल्सला मात दिल्याने त्यांचा रँक अव्वल आहे. तर आता न्यूझीलंडविरुद्धचा भारताचा सामना कधी, कुठे होणार पाहूया...
कधी होणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड हा हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारताचा क्रॉसओव्हर सामना रविवारी 22 जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायकांळी 7 वाजता सामना खेळवला जाईल.
कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.
कसा आहे भारतीय संघ?
अभिषेक, सुरेंदर कुमार, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, जर्मनप्रीत सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), ललित उपाध्याय, कृष्ण पाठक, निलम संजीप एक्सेस, पीआर श्रीजेश, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, वरुण कुमार, आकाशदीप सिंग, अमित रोहिदास (उपकर्णधार), विवेक सागर प्रसाद आणि सुखजीत सिंग.
कसं आहे आगामी वेळापत्रक?
24 जानेवारी
पहिला क्वार्टरफायनल: भुवनेश्वर – सायंकाळी 4:30 वाजता
दुसरा क्वार्टरफायनल: भुवनेश्वर –सायंकाळी 7 वाजता
25 जानेवारी
तिसरा क्वार्टर-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी 4:30 वाजता
चौथा क्वार्टर-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी 7 वाजता
26 जानेवारी
प्लेसमेंट सामने (9 व्या ते 16 व्या क्रमांकासाठी)
27 जानेवारी
पहिला सेमी-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी 4:30 वाजता
दुसरा सेमी-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी 7 वाजता
29 जानेवारी
ब्रॉन्ज मेडल सामना– सायंकाळी 4:30 वाजता
सुवर्णपदकासाठीचा फायनल सामना – सायंकाळी 7 वाजता
हे देखील वाचा