एक्स्प्लोर
ललित मोदींना दिलासा, साक्षीदारांची उलट तपासणी करण्यास परवानगी
याप्रकरणी बीसीसीआयच्या 7 पदाधिकाऱ्यांची उलट तपासणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई : आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. ईडीने आयपीएल संदर्भात दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये साक्षीदारांची उलट तपासणी करण्यासाठी हायकोर्टाने ललित मोदी यांना परवानगी दिली आहे. याप्रकरणी बीसीसीआयच्या 7 पदाधिकाऱ्यांची उलट तपासणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ललित मोदी देशाबाहेर पसार झाल्याने त्यांना साक्षीदारांची उलट तपासणी करण्यासाठी ईडीने विरोध केला होता. ईडी कोर्टाने त्यानुसार उलट तपासणीची परवानगी नाकारली होती. त्याविरोधात ललित मोदींनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
2009 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलमध्ये परकीय चलनाच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी फेमा कायदा अंतर्गत ईडीने गुन्हा दाखल केला होता. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली.
हायकोर्टाने ललित मोदींच्या वकिलांना थेट सवाल केला की, समजा आम्ही परवानगी दिली तर तुम्ही भारतात परत येऊन खटल्याला सामोरं जाणार का? यावर सध्या कोर्टाने आम्हाला साक्षीदारांच्या उलटतपासणीची परवानगी देऊन पारदर्शक खटला चालवण्याची हमी द्यावी, अशी विनंती वकिलांकडून करण्यात आली.
गेल्या 10 वर्षात प्रकरण जैसे थे आहे. यात विशेष काही प्रगती नसल्याने केंद्र सरकारने आता या प्रकरणात लक्ष घालावं, असे निर्देश देत हायकोर्टाने ही याचिका निकाली काढली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement