एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
…मग टीम इंडियावरच निशाणा का? : रवी शास्त्री
विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत 1-2, तर इंग्लंडमध्ये 1-4 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या दोन्ही दौऱ्यांवर कोहलीच्या टीम इंडियाला कामगिरी सुधारण्याची उत्कृष्ट संधी होती.
मुंबई : टीम इंडिया मायदेशात वाघ आहे, पण भारतीय संघाला परदेशात सपाटून मार खावा लागतो. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात आपल्याला त्याचा प्रत्यय आलाचं. पण परदेशात कोणत्याच संघाची कामगिरी चांगली नाही. त्यामुळे परदेशातील कामगिरी वरुन निव्वळ टीम इंडियावर ठपका ठेवणे योग्य ठरणार नसल्याचे वक्तव्य टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दाखल झाल्यावर ब्रिस्बेन येथील पत्रकार परिषदेत रवी शास्त्री बोलताना त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत 1-2, तर इंग्लंडमध्ये 1-4 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या दोन्ही दौऱ्यांवर कोहलीच्या टीम इंडियाला कामगिरी सुधारण्याची उत्कृष्ट संधी होती. पण ती संधी देखील टीम इंडियाने गमवली.
ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणे टीम इंडियासाठी किती महत्त्वाचे आहे, या प्रश्नाला उत्तर देताना रवी शास्त्री म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या चुकांमधून खूप काही शिकायचे असते. आज काल फार थोडय़ाच संघानी परदेशात उत्तम कामगिरी करण्यात यश मिळवले आहे. 1990 च्या दशकात ऑस्ट्रेलिया संघ तर त्यानंतरच्या दशकात काही काळ दक्षिण आफ्रिकेच्या संघाने परदेशी दौऱ्यात उत्तम कामगिरी केली होती. या दोन संघांचा अपवाद वगळता कुठल्याही संघाला विदेशात चांगली कामगिरी करता आली नाही? तर मग भारताचेच नाव का घेतले जाते.’
यावरुनच परदेशातही प्रशिक्षक रवी शास्त्री टीम इंडियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून आले.
संबंधित बातम्या
शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेलाही मुकणार
परदेश दौऱ्यात खेळाडूंच्या पत्नी पूर्णवेळ सोबत असाव्यात, विराटची मागणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
Advertisement