एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Rahul Dravid : टीम इंडियाची 'अभेद्य भिंत' अजूनही बीसीसीआयच्या कागदी घोड्यात अडकली; राहुल द्रविड यांचा धक्कादायक खुलासा!

Head coach Rahul Dravid : द्रविड यांच्या विधानामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर प्रशिक्षक होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. द्रविड यांचा कार्यकाळ विश्वचषक फायनलने संपला आहे.

Rahul Dravid : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी (Rahul Dravid remain Team India Head Coach) कार्यकाळ वाढवण्याच्या वृत्तावर सनसनाटी खुलासा केला आहे. 'मी अद्याप बीसीसीआयच्या कोणत्याही करारावर स्वाक्षरी केलेली नाही, अशी प्रतिक्रिया आज (30 नोव्हेंबर) बीसीसीआयच्या आढावा बैठकीनंतर राहुल द्रविड यांनी दिली. कागदपत्रे मिळाल्यावर मी बघेन, असेही त्यांनी नमूद केले. 

दुसरीकडे, काल (29 नोव्हेंबर) बीसीसीआयने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांबाबत सुरू असलेला सस्पेन्स संपवला होता.  विश्वचषक 2023 पर्यंत टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे भविष्यातही मुख्य प्रशिक्षकपदी राहतील. द्रविड यांच्यासह टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसाठी (वरिष्ठ पुरुष) करार वाढवण्यात आला आहे. मात्र, कराराचा कालावधी किती असेल याबाबत बीसीसीआयने अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नव्हतं. त्यामुळे आता द्रविड यांनी केलेल्या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर संभ्रम निर्माण झाला आहे. 

नेहराकडून नकार 

दरम्यान, आशिष नेहराला बीसीसीआय भारतीय T-20 संघाचे प्रशिक्षक बनवू इच्छित होते, परंतु नेहराने भारतीय T-20 संघाचे प्रशिक्षक बनण्यास नकार दिला आहे. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही संभ्रम

द्रविड यांच्या विधानामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर प्रशिक्षक होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. द्रविड यांचा कार्यकाळ विश्वचषक फायनलने संपला आहे. यापूर्वी असे मानले जात होते की द्रविड यांचा कार्यकाळ वाढवला जाणार नाही. बदल्यात व्हीव्हीएस लक्ष्मण यांना  दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी प्रशिक्षक म्हणून पाठवले जाऊ शकते, अशी चर्चा होती.  टीम इंडिया 10 डिसेंबर 2023 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे.

द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने आशिया कप जिंकला

द्रविड यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. फायनलमधील ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव वगळता टीम इंडियाने वर्ल्डकपमधील सर्व सामने जिंकले. त्याचबरोबर विश्वचषकापूर्वी टीम इंडियाने आशिया कप जिंकला. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सेमीफायनल गाठली होती.

याशिवाय ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका आणि बांगलादेशातील मालिका जिंकली. त्याचबरोबर वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात टी-20 मालिका जिंकण्यातही टीम इंडियाला यश आले. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय इंग्लंडमधील पाचव्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget