एक्स्प्लोर
Happy Birthday Dada : भारताला जिंकायला शिकवणाऱ्या सौरव गांगुलीबाबत खास गोष्टी
सौरव गांगुली दमदार फलंदाजासोबतच उत्कृष्ट कर्णधारही होता. गांगुली हा भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. त्याने संघाला एकजुटीने खेळायला आणि लढून जिंकायला शिकवलं.

मुंबई : स्वत:च्या कामगिरीच्या जोरावर आपलं नाव उज्ज्वल करणारे खेळाडू जगात अनेक आहेत. पण आपलं नाव उज्ज्वल करण्यासोबतच दुसऱ्याचे उत्तम गुण हेरण्याची कला फारच कमी जणांमध्ये असते. हे कौशल्य टीम इंडियाचा 'दादा' सौरव गांगुलीमध्ये होतं. गांगुलीने न केवळ खेळाडूंना ओळखलं, तर त्यांच्यात नेतृत्त्वाची क्षमता निर्माण केली. महेंद्र सिंह धोनी हा त्यापैकीच एक. धोनीला पहिल्यांदा संधी सौरव गांगुलीनेच दिली होती. त्यावेळचा सर्वात यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय संघाच्या भविष्यासाठी सर्वात उत्तम कर्णधार तयार करुन दिला. सौरव गांगुली दमदार फलंदाजासोबतच उत्कृष्ट कर्णधारही होता. गांगुली हा भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. त्याने संघाला एकजुटीने खेळायला आणि लढून जिंकायला शिकवलं. गांगुलीच्या नेतृत्त्वात अनेक खेळाडूंनी आपल्या कारकीर्दीचा सर्वोत्तम काळ पाहिला. याच क्रिकेटच्या 'दादा'चा आज 47 वा वाढदिवस आहे. सौरव गांगुलीचा जन्म 8 जुलै 1972 रोजी कोलकातामध्ये झाला होता. सौरव गांगुलीच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टींवर एक नजर... 1. सौरव गांगुलीचे आई-वडील त्याला प्रेमाने 'महाराज' बोलतात. 2. सौरव अजून 50 पेक्षा जास्त सदस्य असलेल्या संयुक्त कुटुंबात राहतो. त्याच्या घरा 48 खोल्या असून तो 32 गाड्यांचा मालक आहे. 3. गांगुलीने इंजिनिअर किंवा डॉक्टर बनावं, अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती. 4. विशेष म्हणजे सौरव गांगुलीचं पहिलं प्रेम क्रिकेट नाही तर फुटबॉल आहे. 5. क्रिकेट जगतात सौरव गांगुलीला प्रेमाने 'दादा' म्हटलं जातं. 6. सौरव 'प्रिन्स ऑफ कोलकाता' तसंच 'बंगालचा टायगर' नावानेही प्रसिद्ध आहे. 7. तो आपला पहिला एकदिवसीय सामना वेस्ट इंडिजविरोधात 1991 मध्ये खेळला होता. तर पहिला कसोटी सामना 1996 मध्ये इंग्लंडविरोधात ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात खेळला होता. 8. सौरव गांगुलीच्या वडिलांचा प्रिंटिंगचा मोठा व्यवसाय आहे, जो आशियात तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकातामधील सर्वात श्रीमंत पाच व्यक्तिमत्त्वांमध्ये त्यांचाही क्रमांक लागतो. 9. आपल्या क्रिकेट कारकीर्दीत दादाने 49 कसोटी सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं आणि 21 सामन्यात विजय मिळवून दिला. गांगुलीने वनडे मध्ये दहा हजारांपेक्षा जास्त धावाही केल्या आहेत. 10. 19 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2000 मध्ये सौरव गांगुली पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनला होता. 11. कर्णधार म्हणून त्याने पहिल्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन शतकं केली होती. 12. सौरव गांगुली हा वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराचा आवडता भारतीय कर्णधार आहे. 13. गांगुलीच्या आवडत्या क्रिकेटपटूंमध्ये राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर हे भारताचे दोन महान फलंदाज तर वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉ यांचा समावेश आहे. 14. गांगुलीची आवडती खेळाडू स्टेफी ग्राफ आहे, जी जर्मनीची टेनिसपटू आहे. 15. हिंदी सिनेमामध्ये महानायक अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना सौरव गांगुली पसंत करतो. 16. तर ऐश्वर्या राय आणि रवीना टंडन त्याच्या आवडत्या नायिका असून शोले त्याचा आवडता चित्रपट आहे. 17. लंडन आणि दार्जिलिंग ही सौरव गांगुलीची आवडती हॉलिडे डेस्टिनेशन आहेत. 18. 2013 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत दहा क्रिकेटपटूंच्या यादीत सौरव गांगुली सहाव्या स्थानावर होता. 20. सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाची कल्पना सर्वात आधी सौरव गांगुलीला दिली होती.
आणखी वाचा























