44th Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिलेचे मुंबईत स्वागत; पुढील टप्प्यासाठी गोवा सज्ज
44th Chess Olympiad : पहिलीवहिली ऑलिम्पियाड मशाल रिले 19 जून रोजी दिल्लीत सुरू झाल्यानंतर 14 व्या दिवशी महाराष्ट्रात पोहोचली.
44th Chess Olympiad : पहिलीवहिली ऑलिम्पियाड मशाल रिले 19 जून रोजी दिल्लीत सुरू झाल्यानंतर 14 व्या दिवशी महाराष्ट्रात पोहोचली. महाराष्ट्रातील टॉर्च रिलेच्या अंतिम टप्प्यात आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील गरवारे क्लबमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. तत्वपूर्वी नागपूर आणि पुणे येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालीचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुंबई येथे वानखेडे स्टेडियमवर गरवारे क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमात ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, अभिजित कुंटे, सौम्या स्वामीनाथन यांच्यासह क्रीडा विभाग, राज्य बुद्धिबळ संघटनेचे अधिकारी, बुद्धिबळाचे चाहते आणि नवोदित बुद्धिबळपटू उपस्थित होते. 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत चेन्नई येथे 44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड होणार आहे. 1927 पासून आयोजित करण्यात आलेल्या या मानाच्या स्पर्धेचे आयोजन भारतात प्रथमच तर आशियामध्ये 30 वर्षांनंतर केले जात आहे. या स्पर्धेत 189 देशांचे बुदि्धबळपटू सहभागी होणार आहेत. भारत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असताना, बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल देशातील 75 शहरांमध्ये नेली जात आहे.
मुंबईतील या कार्यक्रमाला संबोधित करताना ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांनी मशाल रिलेची सुरुवात भारतात होत असल्याचा आनंद व्यक्त केला. “बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच टॉर्च रिले सादर करण्यात आली आहे; भारतातून टॉर्च रिलेला सुरुवात झाली याचा आम्हाला खूप आनंद आहे,” असे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे म्हणाले. शासनाच्या या उपक्रमामुळे देशात बुद्धिबळ संस्कृती निर्माण होत असून मुलांनाही बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळते. देशात अनेक बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत,असे ते म्हणाले.
#ChessOlympiadTorchRelay gets a grand reception at Mumbai's Wankhede Stadium
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) July 2, 2022
"Government's initiative is creating a chess culture in the country" - Grand Master Abhijit Kunte
Details https://t.co/nW0xi9ClSt
Chess Olympiad Torch at the Gateway of India👇 pic.twitter.com/I3HPQur5ac
बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालचे राज्यस्तरीय बुद्धिबळपटूंनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय संचार ब्युरोने भारतातून बुद्धिबळाचा उगम कसा झाला आणि भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष यावर प्रकाश टाकणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. पायाभूत सुविधांचा विकास, महिला सक्षमीकरण आणि मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांच्या संकल्पनेवर आधारीत कलाकारांनी नुक्कड नाटकही सादर केले. मुंबईतील बुद्धिबळ ऑलिम्पियाड टॉर्च रिलेच्या भव्य स्वागत सोहळ्याचा समारोप ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या हस्ते ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्याकडे मशाल सोपवपून झाला. प्रवासाच्या पुढील टप्प्यात ऑलिम्पियाड मशाल रविवारी सकाळी गोव्यात पोहचणार आहे.