एक्स्प्लोर

गौतम गंभीरचा विराट कोहलीवर संताप, म्हणाला, कर्णधारपदावरुन हटवा!

IPL 2020 : आयपीएल 2020 मधून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीवर टीका होऊ लागली आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं तर विराटला कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.

IPL 2020 : विराट कोहलीच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आरसीबी आयपीएल जिंकू शकली नाही. आयपीएल 2020 च्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 विकेट्सने पराभव केला. या पराभवानंतर विराट कोहलीवर टीका होऊ लागली आहे.  टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं तर विराटला कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.

गौतम गंभीर आयपीएलमधील विराटच्या कर्णधार म्हणून बजावत असलेल्या कामगिरीवर नाराज आहे. गौतम गंभीर म्हणाला की,  विराट कोहलीला आता कर्णधार पदावरुन हटवायला हवं. आठ वर्षापासून विराट संघाचा कर्णधार आहे. या आठ वर्षात त्यानं एकदाही संघाला आयपीएल जिंकून दिलेलं नाही. आठ वर्ष खूप जास्त आहेत, असं गंभीरनं म्हटलं आहे.  गौतम गंभीर म्हणाला की, मला अशा कर्णधाराविषयी सांगा, कर्णधार सोडा अशा खेळाडूविषयी सांगा जो 8 वर्ष एखाद्या टीममध्ये आयपीएल जिंकल्याविना राहिला आहे.

रोहितचं केलं कौतुक गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाइट रायडर्सने 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल जिंकली होती. गंभीर म्हणाला की, 'कोहलीनं स्वता पुढं येत हे मान्य करायला हवं की, तो कर्णधार म्हणून कमजोर आहे. आणि विजय मिळवून देऊ शकत नाही. तो म्हणाला की, किंग्स इलेवन पंजाबचं उदाहरण घ्या. अश्विन दो सिजनमध्ये जिंकू शकला नाही तर त्याला काढून टाकलं.  रोहित शर्मा पाचव्यांदा मुंबई इंडियंसला विजेतेपदाच्या जवळ घेऊन गेला आहे. त्यामुळं तो कर्णधारपदासाठी योग्य आहे.

IPL 13 मधून बाहेर पडल्यानंतर विराट झाला भावूक, म्हणाला, 'ही' चूक महागात पडली

केन विलियमसनचा कॅच सोडणं आम्हाला महागात पडलं - विराट 

आयपीएल जिंकू न शकल्याची खंत व्यक्त करत विराट कोहलीनं आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. विराट कोहलीनं म्हटलं आहे ती, चाहत्यांची साथ आम्हाला मजबूत बनवते. आपल्या प्रेमासाठी आभारी आहे. आपण लवकरच भेटुयात असं त्यानं म्हटलं आहे. विराट कोहलीनं पराभवानंतर आपल्या खेळाडूंचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, चांगल्या आणि वाईट परिस्थितीत आम्ही एकमेकांसोबत होतो. आम्ही एका यूनिटप्रमाणं खेळलो आणि आमचा आयपीएलचा प्रवास चांगला राहिला. मला माझ्या खेळाडूंचा अभिमान आहे.

विराट कोहली म्हणाला की, केन विलियमसनचा कॅच सोडणं आम्हाला महागात पडलं.  देवदत्त पडिकलने सीमारेषेवर केनचा कॅच पकडला होता मात्र सीमारेषेबाहेर जात असल्यानं त्यानं तो कॅच सोडला. मात्र त्यानं पाच धावा वाचवल्या. सामना जिंकायचा म्हटलं की संधीचं सोनं करावं लागतं. जर तो कॅच पकडला असता तर सामन्याचा निकाल वेगळा राहिला असता. केन मैदानावर असल्यानं हैदराबादचा विजय सोपा झाला, असं विराट म्हणाला.

SRHvsRCB Eliminator: हैदराबादची बंगलोरवर 6 विकेट्सनी मात, विल्यम्सनची अर्धशतकी निर्णायक खेळी

हैदराबादकडून रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 विकेट्सने पराभव आयपीएल 2020 च्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 विकेट्सने पराभव केला. बंगलोरने दिलेले 132 धावांचं लक्ष्य हैदराबादने 19.4 षटकात पूर्ण केलं. जेसन होल्डर आणि केन विलियमसन हैदराबादच्या विजयाची हिरो ठरले. केन विल्यम्सन आणि जेसन होल्डरनं पाचव्या विकेटसाठी रचलेली 65 धावांची अभेद्य भागिदारी हैदराबादच्या विजयात निर्णायक ठरली. विल्यम्सननं नाबाद 50 तर होल्डरनं नाबाद 24 धावांची खेळी उभारली. या विजयासह हैदराबाद आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीविरुद्ध खेळणार आहे. तर बंगलोरचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. हैदराबादकडून केन विल्यम्सनने 44 चेंडूत 50 धावांची खेळी केली. मनिष पांडेने 24, जेसन होल्डरने 24 आणि डेविड वॉर्नरने 17 धावा केल्या. बंगलोरकडून मोहम्मद सिराजने दोन, तर एडम जम्पा आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने प्रथम फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादला 132 धावांचे लक्ष्य दिले होते. आरसीबीकडून एबी डिव्हिलियर्सने सर्वाधिक 56 धावा केल्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget