IPL 13 मधून बाहेर पडल्यानंतर विराट झाला भावूक, म्हणाला, 'ही' चूक महागात पडली
IPL 2020 : आयपीएल 2020 च्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 विकेट्सने पराभव केला. या पराभवानंतर विराट कोहली चांगलाच भावूक झाला. यंदाही आयपीएल जिंकू न शकल्याची खंत व्यक्त करत त्यानं आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
IPL 2020 : आयपीएल 2020 च्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 विकेट्सने पराभव केला. या पराभवानंतर विराट कोहली चांगलाच भावूक झाला. यंदाही आयपीएल जिंकू न शकल्याची खंत व्यक्त करत त्यानं आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. विराट कोहलीनं म्हटलं आहे ती, चाहत्यांची साथ आम्हाला मजबूत बनवते. आपल्या प्रेमासाठी आभारी आहे. आपण लवकरच भेटुयात असं त्यानं म्हटलं आहे. विराट कोहलीनं पराभवानंतर आपल्या खेळाडूंचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, चांगल्या आणि वाईट परिस्थितीत आम्ही एकमेकांसोबत होतो. आम्ही एका यूनिटप्रमाणं खेळलो आणि आमचा आयपीएलचा प्रवास चांगला राहिला. मला माझ्या खेळाडूंचा अभिमान आहे. विराट कोहली म्हणाला की, केन विलियमसनचा कॅच सोडणं आम्हाला महागात पडलं. देवदत्त पडिकलने सीमारेषेवर केनचा कॅच पकडला होता मात्र सीमारेषेबाहेर जात असल्यानं त्यानं तो कॅच सोडला. मात्र त्यानं पाच धावा वाचवल्या. सामना जिंकायचा म्हटलं की संधीचं सोनं करावं लागतं. जर तो कॅच पकडला असता तर सामन्याचा निकाल वेगळा राहिला असता. केन मैदानावर असल्यानं हैदराबादचा विजय सोपा झाला, असं विराट म्हणाला.
SRHvsRCB Eliminator: हैदराबादची बंगलोरवर 6 विकेट्सनी मात, विल्यम्सनची अर्धशतकी निर्णायक खेळी आयपीएल 2020 च्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 विकेट्सने पराभव केला. बंगलोरने दिलेले 132 धावांचं लक्ष्य हैदराबादने 19.4 षटकात पूर्ण केलं. जेसन होल्डर आणि केन विलियमसन हैदराबादच्या विजयाची हिरो ठरले. केन विल्यम्सन आणि जेसन होल्डरनं पाचव्या विकेटसाठी रचलेली 65 धावांची अभेद्य भागिदारी हैदराबादच्या विजयात निर्णायक ठरली. विल्यम्सननं नाबाद 50 तर होल्डरनं नाबाद 24 धावांची खेळी उभारली. या विजयासह हैदराबाद आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीविरुद्ध खेळणार आहे. तर बंगलोरचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. हैदराबादकडून केन विल्यम्सनने 44 चेंडूत 50 धावांची खेळी केली. मनिष पांडेने 24, जेसन होल्डरने 24 आणि डेविड वॉर्नरने 17 धावा केल्या. बंगलोरकडून मोहम्मद सिराजने दोन, तर एडम जम्पा आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने प्रथम फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादला 132 धावांचे लक्ष्य दिले होते. आरसीबीकडून एबी डिव्हिलियर्सने सर्वाधिक 56 धावा केल्या.