एक्स्प्लोर

French Open 2020 | नदाल आणि ज्योकोविच फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये!

फ्रेंच ओपनच्या विजेतेपदासाठी सर्बियाचा नोवाक ज्योकोविच आणि स्पेनचा राफेल नदाल यांच्यात लढत होणार आहे. ज्योकोविच पाचव्यांदा फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये पोहोचला असून या ग्रॅण्डस्लॅमची अंतिम फेरी गाठण्याची नदालची ही तेरावी वेळ आहे.

मुंबई : क्ले कोर्टचा राजा स्पेनचा राफेल नदाल आणि सर्बियाचा वर्ल्ड नंबर वन नोवाक ज्योकोविचनं फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नदालनं या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची ही आजवरची तेरावी वेळ आहे. तर ज्योकोविच पाचव्यांदा फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.

नदालकडून श्वार्त्झमनचं आव्हान मोडीत फ्रेंच ओपनच्या पहिल्या उपांत्य सामन्यात राफेल नदालनं अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्त्झमनचा तीन सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला. नदालने हा सामना 6-3, 6-3, 7-6 असा एकतर्फी जिंकला. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान नदालनं एकही सेट न गमावता स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

ज्योकोविचची त्सिसिपासवर मात यंदाच्या फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ज्योकोविचची गाठ पडली ती ग्रीसच्या स्टेफानोस त्सिसिपासशी. ज्योकोविचन सामन्यात पहिले दोन सेट्स 6-3, 6-2 असे आरामात जिंकले. पण त्सिसिपासनं पुढचे दोन्ही सेट्स जिंकून ज्योकोविचसमोर आव्हान निर्माण केलं. पण ज्योकोविचनं आपला सगळा अनुभव पणाला लावून अखेरचा सेट 6-1 असा जिंकला आणि सामनाही खिशात घातला.

नदाल विजेतेपदाची मालिका कायम राखणार? राफेल नदालनं गेल्या पंधरा वर्षात फ्रेंच ओपनमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. 2005 पासून नदालनं 12 वेळा फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. आणि या बाराही वेळा त्यानं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळे नदाल यंदाही ती परंपरा कायम राखणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

ज्योकोविचला दुसऱ्या विजेतेपदाची संधी नोवाक ज्योकोविचनं क्ले कोर्टवरच्या या लढाईत याआधी तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे. पण 2016 साली अँडी मरेला हरवून ज्योकोविचनं एकदाच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. तर दोन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे.

ग्रँड स्लॅम विजेतेपदांची शर्यत राफेल नदालनं आजवरच्या कारकीर्दीत 19 ग्रँड स्लॅम विजेतीपदं पटकावली आहेत. त्यापाठोपाठ ज्योकोविचनंही 17 ग्रँड स्लॅम विजेतीपदांवर आपलं नाव कोरलंय. त्यामुळे ग्रँड स्लॅम विजेतीपदांच्या शर्यतीतली चुरस आणखी वाढणार आहे. या शर्यतीत स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर 20 विजेतेपदांसह आघाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
Ferran Torres Story: वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?
वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?
Shubman Gill: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...
लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget