Deepak Hooda News : कबड्डीपटू दीपक हुड्डा गंगेत गेला वाहून गेला, बचाव पथकाने जीवाची बाजी लावून वाचवलं, बचावकार्याचा थरारक VIDEO
Former Kabaddi Captain Deepak Hooda News : भारतीय कबड्डी संघाचा खेळाडू, आशियाई सुवर्णपदक विजेता आणि माजी प्रो कबड्डी कर्णधार दीपक हुड्डा आज हरिद्वारमध्ये मोठ्या दुर्घटनेपासून बचावला.

Kabaddi Player Deepak Hooda Rescue VIDEO : हरिद्वारमधील हर की पौडीजवळ एक थरारक घटना घडली. भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार एशियन गेम्स सुवर्णपदक विजेता आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित दीपक हुड्डा गंगा नदीत स्नान करत असताना अचानक नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. क्षणार्धात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
बचाव पथकाने जीवाची बाजी लावून वाचवलं
घटनास्थळी तैनात असलेल्या पीएसीच्या जवानांनी लवकर राफ्ट घेऊन नदीत उतरली आणि दीपक हुड्डा यांना सुखरूप बाहेर काढले. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान काही क्षण अतिशय भीषण होते, मात्र जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत दीपकचा जीव वाचवला.
हुड्डा म्हणाला, "माझा पुनर्जन्म झाला"
रेस्क्यूनंतर बोलताना दीपक हुड्डा भावूक झाला. त्याने जवानांचे आभार मानत सांगितले, “माझ्या आयुष्याचा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय. तुमच्यामुळेच मी आज सुरक्षित आहे.”
स्टार कबड्डी खिलाड़ी… और #UttarakhandPolice का स्टार रेस्क्यू!
— Uttarakhand Police (@uttarakhandcops) July 23, 2025
अर्जुन अवॉर्डी व भारतीय टीम के पूर्व कप्तान दीपक हुड्डा हरिद्वार में गंगा के तेज बहाव में फंसे।
मौके पर मौजूद 40वीं वाहिनी ने तुरंत रेस्क्यू कर उन्हें सुरक्षित निकाला।
दीपक हुड्डा ने भी टीम को दिल से धन्यवाद कहा। pic.twitter.com/YJ6zhhGsdb
कोण आहे दीपक हुड्डा?
दीपक हुड्डा हा प्रो-कबड्डी लीगमध्ये भारताचा माजी कर्णधार असून त्याने देशाला अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये गौरव मिळवून दिला आहे. त्याची पत्नी स्वीटी बूरा ही आंतरराष्ट्रीय बॉक्सर असून तिला देखील अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आल्या आहे. हुड्डाला खेळातील भरीव योगदानासाठी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.
दरवर्षी होणाऱ्या दुर्घटना
श्रावण महिन्याच्या निमित्ताने लाखो भाविक हरिद्वारमध्ये स्नान करण्यासाठी येतात. यंदा 11 जुलै ते 23 जुलै दरम्यान पार पडलेल्या कावड यात्रेदरम्यान तब्बल 4 कोटी 13 लाख भाविकांनी गंगाजल भरले. या काळात गंगेत बुडण्याच्या घटना अनेकदा घडतात. यामुळे SDRF, जल पोलिस, पीएसी यांसारख्या यंत्रणांना विविध घाटांवर तैनात केले जाते. केवळ यंदाच्या कावड यात्रेत SDRFने 150 हून अधिक भाविकांचे प्राण वाचवले आहेत. गेल्या वर्षी 2024 मध्ये हे आकडे 250 पर्यंत पोहोचले होते. सध्या श्रावणतील शिवरात्रीचा दिवस असल्यामुळे हरिद्वारमधील सर्व घाटांवर भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
हे ही वाचा -
























