FIFA WC 2022 : यजमान कतार स्पर्धेतून बाहेर; सलग दुसरा पराभव, इक्वेडोरनंतर आता सेनेगलकडून मात
Qatar vs Senegal : फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये यजमान कतारला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. इक्वेडोरनंतर आता सेनेगलकडून कतारच्या संघाचा पराभव केला आहे.
FIFA World Cup 2022 : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत यजमान कतारचं आव्हान संपुष्टात आलं आहे. यजमान कतारला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. कतार आणि सेनेगल ( Qatar vs Senegal ) यांच्यामधील सामन्यात कतारला पराभव पत्करावा लागला आहे. सलामीच्या सामन्यातही यजमान कतारचा इक्वेडोरने पराभव केला होता. त्यानंतर आता सेनेगल विरुद्धचा सामनाही कतारला जिंकता आलेला नाही. सेनेगलने कतारला 3-1 ने हरवलं. दोहा येथील अल थुमामा स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. सलग दुसऱ्या पराभवामुळे यजमान कतारचं पुढील फेरीत जाण्याचे स्वप्नही भंगलं असून कतार स्पर्धेबाहेर गेलं आहे.
सेनेगलचा पहिल्या उत्तरार्धात एक गोल
सामन्याच्या सुरुवातीपासूनच सेनेगलने कतारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि पहिल्या 10 मिनिटांत आक्रमक खेळी करत 2-3 वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या अर्ध्या तासामध्ये सेनेगलचा संघ अधिक वरचढ होता. सेनेगलने कतारला आक्रमणासाठी खूप कमी संधी दिल्या. 41व्या मिनिटाला पहिला गोल करताना सेनेगललाही आक्रमण सुरू ठेवलं. कतारच्या गोलरक्षकाला बॉल क्लिअर करता आला नाही आणि स्ट्रायकर बुलाये डियाने स्विफ्ट झेल घेत गोल केला.
After losing to #Senegal 🇸🇳 by three goals to one, #Qatar 🇶🇦 is the first to leave the cup pic.twitter.com/EXxOEc4nPv
— Qatar World Cup 2022 (NFT) (@QatarWC2022NFT) November 25, 2022
दुसऱ्या उत्तरार्धाच्या सुरुवातील सेनेगलने दुसरा गोल करत कतारच्या अडचणी वाढवल्या. कतारने दुसऱ्या हाफमध्ये 15 मिनिटांनंतर गोलसाठी दोन उत्तम संधी निर्माण केल्या, पण दोन्ही वेळा ही संधी हुकली. कतारने 78व्या मिनिटाला गोल करत सामना रोमांचक केला. इस्माईल मोहम्मदच्या क्रॉसवर मोहम्मद मुंतारीने शानदार हेडरद्वारे कतारसाठी हा गोल केला. यानंतर पाचव्या मिनिटाला सेनेगने तिसरा गोल केला आणि सामन्यात 3-1 ने विजय मिळवला.
यजमान कतार स्पर्धेतून बाहेर
फिफा विश्वचषकांच्या इतिहासात यजमान कतारने नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे. कतार असा पहिला यजमान देश आहे, जो सलग दोन सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत यजमान कतारचं आव्हान संपुष्टात आलं आहे. सेनेगलने कतार विरुद्धच्या सामन्या त्यांचा पहिला विजय मिळवला. यानंतर आता सेनेगल तीनही गट स्टेजमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. सेनेगलने एकापेक्षा जास्त गोलच्या फरकाने सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यजमान राष्ट्राला हरवणारा सेनेगल हा पहिला आफ्रिकन संघ
फिफा विश्वचषकात यजमान देशाला हरवणारा सेनेगल हा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे. सेनेगलने कतारवर 3-1 च्या फरकाने विजय मिळवला. सेनेगलने फिफा विश्वचषकातील सामन्यात दुसऱ्यांदा तीन गोल केले आहेत. यापूर्वी 2002 मध्ये सेनेगलने उरुग्वेविरुद्ध 3-3 अशी बरोबरी केली होती.