एक्स्प्लोर

Qatar vs Ecuador : सलामीच्या सामन्यात यजमान कतारचा पराभव, नकोसा विक्रम झाला नावे

Fifa WC 2022 : इक्वेडोर विरुद्ध कतार या सलामीच्या सामन्यात कतारचा 2-0 ने पराभव झाला, या पराभवासह त्यांनी नकोसा विक्रम नावे केला आहे.

FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्ड कप 2022 ची सुरुवात 20 नोव्हेंबर (रविवार) पासून झाली. जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार आणि दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोर (Ecuador vs qatar) यांच्यात खेळला गेला. या सामन्यादरम्यान कतारच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. कारण फिफा विश्वचषकाच्या 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान देश असणाऱ्या संघाने सलामीचा सामना गमावला आहे. अल बायत स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इक्वेडोरने यजमानांचा 2-0 असा पराभव केला. 

कतारपूर्वी 22 देशांनी फिफा विश्वचषकाचे आयोजन केले आहे. यापैकी 16 देश असे आहेत की त्यांना विश्वचषकातील पहिला सामना जिंकण्यात यश आले. तर 6 देशांनी वर्ल्डकपचा ​​पहिला सामना ड्रॉ केला आहे. पण फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 92 वर्षांच्या इतिहासात यजमानपद भूषवताना पराभव कोणीच पत्करलेला नाही. विशेष म्हणजे कतारचा संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. 

सामन्याचा लेखा-जोखा

सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला इक्वेडोरनं गोल डागत कतारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण रेफरीनं VAR द्वारे गोल रद्द झाल्याचं घोषित केलं. हा गोल व्हॅलेन्सियानं केला होता. त्यानंतर याच सामन्याच्या 16व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रूपांतर करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 31व्या मिनिटाला व्हॅलेन्सियानं शानदार हेडर करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. कतारच्या डिफेन्सच्या चुकीमुळेच इक्वाडोरला दुसरा गोल डागण्याची संधी मिळाली.  सेकंड हाफमध्ये कतारनं इक्वाडोरला पूर्वार्धाच्या तुलनेत कडवी झुंज दिल्याचं पाहायला मिळालं. कतारनं डिफेंडकरत गोल करण्याचे प्रयत्न केले. पण त्यांचा प्रयत्वन इक्वेडोरनं सफल होऊ दिले नाहीत. सामन्याच्या 67व्या मिनिटाला पेड्रो मिगुएलने कतारसाठी गोल डागण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या पदरी अपयशच आलं. इक्वेडोरचं प्रसंगावधान आणि उत्तम डिफेंड यामुळे यजमान कतारला पहिल्याच सामन्यात परभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या काही मिनिटांत कतारचा संघ अधिक आक्रमक दिसला, तर सामन्याच्या पूर्वाधापासूनच आघाडीवर असलेला इक्वेडोर फुटबॉल संघ डिफेंन्सच्या भूमिकेत पाहायला मिळाला. ज्यानंतर अखेर 2-0 अशा फरकानं इक्वेडोरनं कतारवर (Ecuador beat qatar) विजय मिळवला.

हे देखील वाचा-

Fifa World Cup 2022 : आज बलाढ्य इंग्लंडसमोर इराणचं आव्हान, पहिल्यांदाच दोघेही एकमेंकाविरुद्ध मैदानात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget