FIFA WC 2022: पॉल पोग्बापासून सादियो मानेपर्यंत, 10 स्टार फुटबॉलपटू फिफा वर्ल्डकपमधून बाहेर
FIFA World Cup 2022 Injury: फुटबॉल विश्वचषकातील 26 सदस्यीय संघात स्थान मिळवल्यानंतरही स्पर्धेतून बाहेर पडणं, एखाद्या खेळाडूसाठी यापेक्षा दुसरी दु:खद गोष्ट असू शकत नाही.
FIFA World Cup 2022 Injury: जगभरातील प्रत्येक फुटबॉलपटूचं फिफा विश्वचषकात आपपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न असतं. फुटबॉल विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यासाठी प्रत्येक संघ संघर्ष करतात. विशेष म्हणजे, संघ पात्र ठरल्यानंतरही 26 सदस्यीय संघाचा भाग होणं एखाद्या खेळाडूसाठी अधिक महत्वाचं असतं. यंदाच्या फुटबॉल विश्वचषकात काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी 26 सदस्यीय संघात स्थान मिळवलं. पण दुखापतीमुळं त्यांना या स्पर्धेतून मुकावं लागलंय. या खेळाडूंसाठी यापेक्षा दुसरी दु:खद गोष्ट असू शकत नाही.
फुटबॉल विश्वचषकाला मुकलेलं 10 स्टार खेळाडूंची यादी:
1) पॉल पोग्बा (फ्रान्स)
या स्पर्धेच्या सुरुवातीला फ्रान्स फुटबॉल संघाचा मिडफिल्डर पॉल पोग्बाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. सप्टेंबरमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळं तो यंदाच्या विश्वचषकात फ्रान्स संघाचा भाग नाही
2) एनगोलो कांटे (फ्रान्स)
फ्रान्सचा आणखी एक खेळाडू मिडफिल्डर एन'गोलो कांटे हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलाय. पुढील तीन महिने तो कोणत्याही प्रकारच्या सामन्यात दिसणार नाही.
3)टिमो वर्नर (जर्मनी)
जर्मनीचा स्ट्रायकर टिमो वर्नरला नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पायाला दुखापत झाली होती. शाख्तर डोनेत्स्क विरुद्ध चॅम्पियन्स लीग सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती. परिणामी, त्याला फुटबॉल विश्वचषकातून बाहेर पडावं लागलंय.
4) रीस जेम्स (इंग्लंड)
इंग्लंडचा 22 वर्षीय राइट बॅक प्लेयर रीस जेम्सही या विश्वचषकात दिसणार नाही. ऑक्टोबरमध्ये एसी मिलानविरुद्ध चॅम्पियन्स लीग सामन्यात चेल्सीकडून खेळताना त्याला गुडघ्याला दुखापत झाली होती.
5) डिएगो जोटा (पोर्तुगाल)
पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर डिओगो जोटाही वर्ल्डकप फ्लाइटला मुकला आहे. लिव्हरपूलच्या या फॉरवर्ड खेळाडूला मँचेस्टर सिटीविरुद्धच्या सामन्यादरम्यान खूप दुखापत झाली होती.
6) आर्थर मेलो (ब्राझील)
ब्राझीलचा मिडफिल्डर आर्थर मेलो ऑक्टोबर महिन्यात जखमी झाला होता. लिव्हरपूलच्या या खेळाडूला चॅम्पियन्स लीगमध्ये रेंजर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान पायाला दुखापत झाली होती. ज्यामुळं यंदाच्या फुटबॉल विश्वचषकात खेळता येणार नाही.
7) मार्को रियूस (जर्मनी)
जर्मनीचा दिग्गज खेळाडू मार्को रेउस पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळं फुटबॉल विश्वचषकाला मुकलाय. त्याच्या पायाला दुखापत झाली होती. 2014 मध्येही मार्को दुखापतीमुळं जर्मनीच्या संघाचा भाग बनू शकला नव्हता.
8) बेन चिलविल (इंग्लंड)
इंग्लंडचा लेफ्ट बॅक बेन चिलविलनेही निराशा केली आहे. डायनामो झाग्रेब विरुद्ध चॅम्पियन्स लीग सामन्यादरम्यान चेल्सीचा हा स्टार खेळाडू जखमी झाला होता.
9) सादियो माने (सेनेगल)
सेनेगलचा स्टार फॉरवर्ड साजियो मानेही यंदाच्या फुटबॉल विश्वचषकात दिसणार नाही. दुखापतीनंतरही त्याचा विश्वचषक संघात समावेश करण्यात आला होता मात्र आता तो पूर्णपणे बरा न झाल्यामुळे त्याला वगळण्यात आले आहे.
10) निकोलस गोन्झालेझ (अर्जेंटिना)
अर्जेंटिनाचा निकोलस गोन्झालेझ 17 नोव्हेंबर रोजी प्रशिक्षणादरम्यान जखमी झाला होता. त्याच्या जागी राष्ट्रीय संघाच्या कर्मचाऱ्यांनी एंजल कोरियाचा संघात समावेश करण्यात आलाय.
हे देखील वाचा-