एक्स्प्लोर

T20 World Cup fallout: बीसीसीआयकडून अध्यक्षांसह संपूर्ण निवड समितीच बरखास्त; 5 मोठी कारणं समोर

T20 World Cup fallout: टी-20 विश्वचषक स्पर्धेची स्वप्नवत परिणती गृहीत धरून तरंगणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडकडून मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. हा पराभव बीसीसीआयच्या (BCCI) चांगलाच जिव्हारी लागलाय.

T20 World Cup fallout: टी-20 विश्वचषक स्पर्धेची स्वप्नवत परिणती गृहीत धरून तरंगणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडकडून मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. हा पराभव बीसीसीआयच्या (BCCI) चांगलाच जिव्हारी लागलाय. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक बदल होण्याची दाट शक्यता होती. यातच भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं शुक्रवारी (18 नोव्हेंबर) संपूर्ण निवड समितीच अध्यक्षांसह बरखास्त (Selection Committee) करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच नव्या निवडसमितीसाठी तातडीनं अर्ज देखील मागवले आहेत. पण बीसीसीआयनं तडकाफडकी संपूर्ण निवड समितीच बरखास्त का केली? यामागचे पाच मोठे कारण जाणून घेऊयात.

दरम्यान, 24 डिसेंबर 2020 रोजी बीसीसीआयनं चेतन शर्मा यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड केली होती. शर्मा यांच्यासह ॲबी कुरुविला आणि देबाशीष मोहंती यांचाही निवड समितीत समावेश करण्यात आला होता. सुनील जोशी आणि हरविंदरसिंग निवड यांना समितीत कायम ठेवण्यात आले  होते. पण आता बीसीसीआयने एकाही सदस्याला कायम न ठेवता सर्वच जागांसाठी अर्ज मागवले आहेत.

1) वर्षभरात आठ खेळाडूंना कर्णधारपद
वर्षभरात चेतन शर्मा आणि त्याचे पॅनल टीम इंडियाला स्थिर संघ देऊ शकले नाही. मागील एक वर्षात भारतीय संघाच्या आठ खेळाडूंना कर्णधारपद देण्यात आलं होतं. टी-20 विश्वचषकापूर्वीही संघ संयोजनाबाबत सातत्यानं प्रयोग केले जात होते. अशा स्थितीत भारतीय संघाला एक परिपूर्ण प्लेइंग इलेव्हन तयार करता आली नाही.

2) केएल राहुलचं संघात पुनरागमन
आठ महिन्यांच्या मोठ्या स्पर्धांनंतर लगेचच केएल राहुलला संघात आणण्यासारखे निर्णयही टीकेचे धनी ठरले. केएल राहुल त्याच्या पुनरागमनानंतर मोठ्या सामन्यांमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला.

3) देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वगळलं
देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना चेतन आणि त्यांच्या टीमनं संधी दिली नाही. टी-20 विश्वचषक संघासाठी त्यांनी काही निवडक खेळाडूंवर विश्वास ठेवून त्यांची निवड केली.

4) वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली खेळाडूंना विश्रांती
वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली खेळाडूंना पर्यायी ब्रेक देण्याच्या त्यांच्या निर्णयांवरही सातत्यानं टीका होत आहे.

5) शिखरन धवनबाबतही मोठा प्रश्न उपस्थित
शिखर धवनला वनडे संघात सतत संधी दिली जात आहे. तो सतत एकदिवसीय संघाचा कर्णधार बनत आहे. तो 37 वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत तो पुढील विश्वचषकासाठी भारतीय संघात असेल की नाही हे स्पष्ट नाही, असे अनेक मुद्दे चेतन शर्मा आणि त्यांच्या पॅनलच्या निर्णयांमुळं उपस्थित होत आहेत.

नवीन निवडकर्त्यांवर कोणती मुख्य जबाबदारी असणार?
- प्रत्येक प्रकारच्या संघासाठी कर्णधाराची नियुक्ती करणे
- मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार करा
- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळ पाहण्यासाठी प्रवास करा
- संघ निवडीवर मीडियाला संबोधित करा
- योग्य आणि पारदर्शक पद्धतीने शक्य तितका सर्वोत्तम संघ निवडा

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझाRajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget