फिफामध्ये धक्कादायक निकाल, पाच वेळच्या चॅम्पियन ब्राझीलला पराभवाची 'किक'
Croatia vs Brazil FIFA World Cup 2022 Quater Final: फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. विजेतेपदाचा दावेदार ब्राझीलला उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
BRA vs CRO, FIFA WC Quarter Final: फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. विजेतेपदाचा दावेदार ब्राझीलला उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. क्रोएशियाने पाच वेळच्या चॅम्पियन ब्राझीलला पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत केलेय. या विजयासह क्रोएशियानं उपांत्य फेरीत स्थान पटकावलेय. (Croatia vs Brazil FIFA World Cup 2022 Quater Final)
कतारमध्ये सुरु असेलेल्या फिफा विश्वचषकातील पहिल्या उपांत्य पूर्व सामन्यात पाच वेळच्या चॅम्पियन ब्राझीलला पराभवाचा सामना करावा लागला. फूटबॉलमधील आघाडाचा ब्राझील संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. क्रोएशियानं ब्राझिलला पहिल्यांदाच विश्वचषकात पराभूत केलेय. क्रोएशियानं लगोपाठ दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर ब्राझीलचा संघ लागोपाठ दुसऱ्यांदा उपांत्य पूर्व फेरीत पराभूत झालाय. ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमारने गोल केला, पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले. अतिरिक्त वेळेनंतरही ब्राझिल आणि क्रोएशिया यांचा स्कोर 1-1 असा समान होता. त्यामुळे पेनेल्टी शूटआऊटद्वारे सामन्याचा निकाल लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियानं 4-2 ने बाजी मारली.
116 व्या मिनिटांपर्यंत ब्राझील संघाचा विजय निश्चित होता. कारण, नेमारने केलेल्या गोलमुळे ब्राझिल 1-0 ने आघाडीवर होता. पण अखेरच्या चार मिनिटात क्रोएशियानं सामना पलटवला. चार मिनिटं बाकी असताना क्रोएशियानं सामन्यात पुनरागमन केले. ब्रूनो पेट्कोविच याने 117 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी केली. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियानं सामना जिंकला अन् पाच वेळच्या चॅम्पियनचं आव्हान संपुष्टात आलं.
ब्राझीलच्या पराभवानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. ब्राझीलच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. तर काहींनी क्रोएशियाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. ब्राझिलच्या पराभवानंतर नेमारला अश्रू लपवता आले नाहीत. मैदानात त्याला रडू कोसळलं.
Neymar couldn't hold back tears after that heartbreaking loss 💔 pic.twitter.com/TW3qq61CBE
— FOX Soccer (@FOXSoccer) December 9, 2022
Heartbreak 💔 for Brazil 🇧🇷#TelegraphFootball #FIFAWorldCup pic.twitter.com/1nvaLAu936
— Telegraph Football (@TeleFootball) December 9, 2022
FT' ⌚ Croatia 🇭🇷 1-1 Brazil (4-2 Pen)
— GOAL Africa (@GOALAfrica) December 9, 2022
Croatia 🇭🇷 knock Brazil 🇧🇷 out of #FIFAWorldCup on penalties 🙌 pic.twitter.com/oUtKljuSra
Luka Modric consoling Brazil players at full-time ❤️ pic.twitter.com/ne53BeJ0W2
— GOAL (@goal) December 9, 2022
😢 Heartbreak for Neymar and Brazil.#FIFAWorldCup #Qatar2022 #CROBRA pic.twitter.com/hfcfISbdeJ
— beIN SPORTS (@beINSPORTS_EN) December 9, 2022
हे देखील वाचा-