एक्स्प्लोर

Gerard Pique Retirement : बार्सिलोनाचा स्टार डिफेंडर जेरार्ड पीकने घेतली निवृत्ती, इमोशनल VIDEO पोस्ट करत दिली माहिती

Gerard Pique : जेरार्ड पीक बार्सिलोना संघाचा एक स्टार खेळाडू राहिला असून त्याने संघासाठी 615 सामने खेळले आहेत. 

Footballer Gerard Pique Retirement : फुटबॉल खेळात सर्वाधिक प्रसिद्धी ही स्ट्रायकर खेळाडूंना अर्थात गोल करण्यासाठी पुढच्या बाजूस खेळणाऱ्यांना मिळते. पण अशातही एक डिफेन्डर असूनही जागतिक फुटबॉलमधला स्टार खेळाडू झालेल्या फुटबॉलरमधील एक नाव म्हणजे, जेरार्ड पिक (Gerard Pique). स्पेनकडून खेळणाऱ्या पिकने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केलं होतं. त्यानंतर आता बार्सिलोना क्लबची शान असणाऱ्या पिकने नुकतीच निवृत्तीची क्लब फुटबॉलमधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. शनिवारी अल्मेरिया फुटबॉल क्लबविरुद्ध होणारा सामना त्याच्या क्लब कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. 35 वर्षीय स्पॅनिश खेळाडू पिकने ट्वीटरवर एका पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे.

पिकने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो बार्सिलोनासोबतच्या त्याच्या प्रवासाची गोष्ट सांगत आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा लहानपणापासूनचा प्रवास दिसून येत आहे. आधीपासूनच तो बार्सिलोना संघासोबत मानसिक दृष्ट्याही जोडला गेल्याचं दिसून येत आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, ज्या क्षणी मला माझा हा प्रवास संपवायचा आहे तो क्षण मी निवडला आहे. शनिवारी, मी कॅम्पानाऊ (बार्सिलोना स्टेडियम) येथे शेवटचा सामना खेळणार आहे. बार्सिलोना नंतर मी इतर कोणत्याही संघासोबत जाणार नाही.'

पाहा VIDEO-

फिफा विश्वचषक विजेत्या संघात होता पिक

बार्सिलोना संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पिकने त्याचा देश स्पेनकडूनही अप्रतिम कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. 2009 ते 2018 अशी 9 वर्षे स्पेन नॅशनल टीमकडून खेळताना त्याने एक डिफेंडर म्हणून कायमच संघासाठी मोलाचं योगदान दिलं. 2010 मध्ये फिफा विश्वचषक आणि 2012 मध्ये युरो कप जिंकणाऱ्या स्पॅनिश संघाचाही तो भाग होता. फुटबॉल जगतातील सर्वोत्तम डिफेंडर्समध्ये जेरार्डची गणना होते. 

बार्सिलोना संघासाठी खास कामगिरी

बार्सिलोनासोबत जेरार्ड पिकचा प्रवास खूप अगदी अविस्मरणीय असा आहे. बार्सिलोनासोबत असताना त्याने तीन चॅम्पियन्स लीग जिंकले आहेत. जेरार्डने बार्सिलोनासह 8 ला लीगा, 7 कोपा डेल रे, 3 क्लब वर्ल्ड कप, 3 युरोपियन सुपर कप, 6 स्पॅनिश सुपर कप जिंकले आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मँचेस्टर युनायटेडमधून केली. जेरार्डने या इंग्लिश क्लबसोबत चॅम्पियन्स लीग, प्रीमियर लीग आणि इंग्लिश लीग कपही जिंकले होते. जेरार्डने बार्सिलोनासाठी 315 सामने खेळले असून एक डिफेंडर असूनही त्याने 52 गोल्स देखील केले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर टीम इंडियाच्या मदतीला, रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला
ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर टीम इंडियाच्या मदतीला, रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला
Beed News : सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
पुष्पा-2 मध्ये अल्लू अर्जुनलाही खाऊन टाकणारा व्हिलन तारक पोनप्पा चक्क कृणाल पांड्याची कार्बन कॉपी, फॅन्सही गोंधळले!
पुष्पा-2 मध्ये अल्लू अर्जुनलाही खाऊन टाकणारा व्हिलन तारक पोनप्पा चक्क कृणाल पांड्याची कार्बन कॉपी, फॅन्सही गोंधळले!
सगळं मोफत वाटण्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा, मोफत लाभाच्या योजनांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत
सगळं मोफत वाटण्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा, मोफत लाभाच्या योजनांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajan Naik Local Train : लोकलचा प्रवास, भजनाचा आनंद , राजन नाईक यांचा लोकलने प्रवासABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 10 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स-Kurla Buss Accident Driver Beatnup : कुर्ला बस अपघातातील चालकाला जमावाची मारहाणABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 10 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर टीम इंडियाच्या मदतीला, रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला
ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर टीम इंडियाच्या मदतीला, रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला
Beed News : सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
पुष्पा-2 मध्ये अल्लू अर्जुनलाही खाऊन टाकणारा व्हिलन तारक पोनप्पा चक्क कृणाल पांड्याची कार्बन कॉपी, फॅन्सही गोंधळले!
पुष्पा-2 मध्ये अल्लू अर्जुनलाही खाऊन टाकणारा व्हिलन तारक पोनप्पा चक्क कृणाल पांड्याची कार्बन कॉपी, फॅन्सही गोंधळले!
सगळं मोफत वाटण्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा, मोफत लाभाच्या योजनांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत
सगळं मोफत वाटण्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा, मोफत लाभाच्या योजनांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत
Kurla Best Bus Accident: बसची फॉरेंसिक टीमकडून तपासणी, आरटीओचे अधिकारीही दाखल; तज्ञ म्हणाले, तर बस पुढेच जाणार नाही!
बसची फॉरेंसिक टीमकडून तपासणी, आरटीओचे अधिकारीही दाखल; तज्ञ म्हणाले, तर बस पुढेच जाणार नाही!
Satish Wagh Case: अंगावर जखमा, दांडक्याचे वळ अन्... आमदार टिळेकरांच्या मामाची हत्या कशी झाली?, पंचनाम्यानंतर पोलिसांनी काय सांगितलं?
अंगावर जखमा, दांडक्याचे वळ अन्... आमदार टिळेकरांच्या मामाची हत्या कशी झाली?, पंचनाम्यानंतर पोलिसांनी काय सांगितलं?
Kurla Bus Accident: स्टेअरिंग गरागरा फिरवायची सवय असणाऱ्या संजय मोरेंच्या हातात इलेक्ट्रिक बसचं पॉवर स्टेअरिंग आलं अन् घात झाला?
मिनी बस चालवणाऱ्या संजय मोरेला मोठी बस चालवायला दिली अन् घात झाला, पॉवर स्टेअरिंगमुळे अंदाज चुकला?
निवडणूक संपताच मोठी बातमी, नाशिकमध्ये सापडले पंतप्रधान पिक विमा योजनेचे बोगस लाभार्थी? नेमका प्रकार काय?
निवडणूक संपताच मोठी बातमी, नाशिकमध्ये सापडले पंतप्रधान पिक विमा योजनेचे बोगस लाभार्थी? नेमका प्रकार काय?
Embed widget