Abhishek Sharma : वानखेडेवर इंग्रजांना धावांचा 'अभिषेक' घालताच फ्लाईंग किस सेलिब्रेशन, पण ती स्पेशल व्यक्ती कोण? विक्रमवीर अभिषेक शर्मानं केला खुलासा!
Abhishek Sharma : टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने स्टँडच्या दिशेने फ्लाइंग किस देऊन आनंद साजरा केला.

Abhishek Sharma : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 150 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी 248 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र त्यांना केवळ 97 धावा करता आल्या. या शानदार विजयासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने टी-20 मालिका 4-1 अशी खिशात घातली. सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा हा वानखेडे टी-२० मध्ये भारताच्या विजयाचा हिरो ठरला. डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने 54 चेंडूंत 13 षटकार आणि 7 चौकारांसह 135 धावा केल्या. यानंतर अभिषेक शर्मानेही गोलंदाजीत कमाल केली आणि तीन धावांत दोन बळी घेतले.
Abhishek Sharma hugging his sister and mother after the match. 🥺❤️
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 3, 2025
- Moment of the day! 🌟 pic.twitter.com/a3dRCpZhw4
अभिषेक शर्माचे फ्लाईंग किस सेलिब्रेशन
टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने स्टँडच्या दिशेने फ्लाइंग किस देऊन आनंद साजरा केला. भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा अभिषेक हा दुसरा फलंदाज आहे. त्याने 37 चेंडूत शतकही केले. भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावणारा तो फलंदाज आहे. दरम्यान, अभिषेकच्या फ्लाईंग किसनंतर चांगलीच चर्चा रंगली. सामना संपताच अभिषेक फ्लाईंग किसचा किस्सा सांगितला. सामना पाहण्यासाठी अभिषेकचे आई तसेच बहिण सुद्धा उपस्थित होती. त्यामुळे विक्रमी तडाखा दिल्यानंतर स्टँडच्या दिशेने आपल्या कुटुबीयांना फ्लाईंग किस दिल्याचे अभिषेकने सांगितले.
Abhishek Sharma said, "the celebration was for my parents and sister. When you perform like that and make them proud, you yourself feel proud". ❤️ pic.twitter.com/A0UZ2aytoo
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 3, 2025
दुसरीकडे, अभिषेक शर्मासाठी रविवारचा दिवस खूप चांगला होता. त्याने पहिल्या षटकातील पहिल्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट्स घेतल्या. अभिषेकच्या पाचव्या चेंडूवर कर्णधार सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला. इथे अभिषेकने फुल लेन्थ बॉल जेमी ओव्हरटनकडे टाकला. त्याने मोठा शॉट खेळला पण चेंडू बॅटच्या बाहेरील कडा घेऊन शॉर्ट कव्हरवर उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवकडे गेला. पाठीमागे धावताना त्याने अप्रतिम झेल घेतला.
⚡️💨 💯 Abhishek Sharma!pic.twitter.com/Kg2L2kdXW2
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 2, 2025
नाणेफेकीपूर्वी ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक, बॉलिवूड स्टार आमिर खान आणि ब्रिटनचे प्रिन्स एडवर्ड मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पोहोचले. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यांनी ब्रिटनचे प्रिन्स एडवर्ड यांची भेट घेतली. प्रिन्स एडवर्ड यांना ड्यूक ऑफ एडिनबर्ग ही पदवी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























