Abhishek Sharma : मी माझ्या संपूर्ण आयुष्यात मारलेल्या सिक्सपैकी जास्त सिक्स अभिषेकने फक्त दोन तासात मारले! माजी इंग्लंड कॅप्टनची बोलती सपशेल बंद
सामन्याच्या 10.1 षटकात शतक झळकावणारा अभिषेक हा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. त्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 10.2 षटकांत शतक झळकावले होते.

Abhishek Sharma : टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माच्या वादळी 135 धावांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या T20 सामन्यात इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. 248 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही आणि 10.3 षटकात 97 धावांत सर्वबाद झाला. रविवार हा अभिषेक शर्माच्या नावावर विक्रमांचा दिवस होता. T20I डावात सर्वाधिक षटकार मारणारा अभिषेक भारताचा खेळाडू ठरला. एका डावात भारताची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा तो खेळाडूही ठरला. भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक आणि शतक झळकावणारा अभिषेक हा दुसरा फलंदाज आहे. 150 धावांनी झालेला पराभव हा इंग्लंडचा T20 मधील सर्वात मोठा पराभव आहे.
अभिषेकची खेळी पाहून अॅलिस्टर कूकची बोलती बंद!
इंग्लंडचा माजी कॅप्टन अॅलिस्टर कुकची अभिषेक शर्माची खेळी पाहून कौतुकाचा वर्षाव केला. तो म्हणाला की, "अभिषेक शर्माने दोन तासांत माझ्या संपूर्ण आयुष्यात मी मारलेल्या षटकारांपेक्षा जास्त षटकार मारले". अभिषेकच्या खेळीने विक्रमांचे रतीब घातले आहे.
Alastair Cook said, "Abhishek Sharma hit more sixes in two hours than I hit in my whole life". pic.twitter.com/SN3jnuvY4W
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 2, 2025
एक नजर अभिषेकच्या विक्रमावर
सामन्याच्या 10.1 षटकात शतक झळकावणारा अभिषेक हा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. त्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 10.2 षटकांत शतक झळकावले होते.
T20I मालिकेत सूर्यकुमार यादव 5.60 च्या सरासरीने केवळ 28 धावा करू शकला. टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील भारतीय कर्णधाराची ही सर्वात कमी सरासरी आहे.
250 च्या स्ट्राईक रेटने शतक झळकावणारा अभिषेक हा भारताचा तिसरा खेळाडू आहे. 2017 मध्ये रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले आहे आणि 2024 मध्ये टिळक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 250 प्लस स्ट्राइक रेटने शतक झळकावले आहे.
या मालिकेत, जोफ्रा आर्चरविरुद्ध 14 षटकार मारले गेले, जे कोणत्याही मालिकेत गोलंदाजाविरुद्ध मारले गेलेले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक षटकार होते. 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनगिडीने वेस्ट इंडिजविरुद्ध 16 षटकार ठोकले होते.
2ND FASTEST HUNDRED FOR INDIA IN T20IS. 🥶
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 2, 2025
- Abhishek Sharma, remember the name!pic.twitter.com/5bVIjGns6E
1. T-20I मधील इंग्लंडचा सर्वात मोठा पराभव
धावांच्या बाबतीत इंग्लंडला सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला. भारताने इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. टी-20 मधील भारताचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. याआधी टीमने 2023 मध्ये अहमदाबादच्या मैदानावर न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला होता.
2. सामन्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा संजू हा तिसरा भारतीय
सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन हा T20I च्या पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा तिसरा भारतीय ठरला आहे. आज त्याने जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्याच्याआधी झिम्बाब्वेचा यशस्वी जैस्वाल आणि झिम्बाब्वेचा रोहित शर्मा यांनी श्रीलंकेच्या आदिल रशीदच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला आहे.
3. अभिषेकने T-20I मध्ये भारतासाठी दुसरे सर्वात जलद अर्धशतक केले
सलामीवीर अभिषेक शर्माने 17 चेंडूत अर्धशतक झळकावले. यासह, आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा तो भारताचा दुसरा फलंदाज ठरला. अभिषेकचा पहिल्या क्रमांकावर असलेला आदर्श युवराज सिंग आहे, त्याने 2007 च्या T-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. या डावात त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकारही ठोकले.
4. भारताने आपला सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर केला
भारताने रविवारी T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध आपली सर्वोच्च पॉवरप्ले धावसंख्या केली. संघाने पहिल्या 6 षटकात एक विकेट गमावून 95 धावा केल्या. यापूर्वी 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध संघाने 82/1 धावा केल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या






















