एक्स्प्लोर
Advertisement
टी20मध्ये त्रिशतक ठोकणाऱ्या मोहितला आता आयपीएलचे वेध!
नवी दिल्ली: दिल्ली रणजी संघात खेळणारा 21 वर्षीय फलंदाज मोहित अहलावतनं टी20 सामन्यात त्रिशतक झळकावून एक जागतिक विक्रम रचला आहे. त्यामुळे आता या धडाकेबाज खेळाडूची नजर सध्या आयपीएलवर आहे.
अवघ्या 72 चेंडूत 39 षटकार आणि 14 चौकार ठोकत मोहितनं दणदणीत त्रिशतक ठोकलं. त्यामुळे त्याच्या संघानं 20 षटकात तब्बल 416 धावांचा डोंगर रचला. तेव्हापासून मोहित बराच चर्चेत आहे.
या धडाकेबाज खेळीनंतर मोहित म्हणाला की, 'मी असं काही केलं आहे यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. मला आशा आहे की, माझ्या या खेळीमुळे गौतम गंभीरचं माझ्याकडं लक्ष जाईल.' कारण की, दिल्लीच्या रणजी संघातही गौतम गंभीरनं मोहितला स्थान दिलं होतं. त्यामुळे मोहितला असं वाटतं की, गंभीर त्याला त्याच्या आयपीएल संघात स्थान देईल. कारण की, मोहितनं आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावासाठी आपलं नाव पाठवलं आहे.
'मी आयपीएल 10च्या लिलावासाठी माझं नाव पाठवलं आहे. पण मला माहित नाही की, माझ्याकडे संघ मालकांचं लक्ष जाईल की नाही. पण आयपीएलमध्ये माझा खेळ दाखविण्यासाठी मी वाट पाहतो आहे.' असंही मोहित म्हणाला.
'ही खेळी खेळताना माझ्या डोक्यात कुठंही विक्रम करायाचा असं अजिबात नव्हतं.' असंही मोहित म्हणाला.
संबंधित बातम्या:
39 सिक्स, 14 चौकार, टी ट्वेण्टीत त्रिशतक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement