एक्स्प्लोर
जाडेजाच्या वरातीत हवेत गोळीबार, नातेवाईकाविरोधात गुन्हा
राजकोट : टीम इंडिया आणि गुजरात लायन्सचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाच्या लग्नाच्या वरातीदरम्यान हवेत गोळीबारप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. या प्रकरणी रवींद्र जाडेजाच्या एका नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकोटमध्ये 17 एप्रिल रोजी रवींद्र जाडेजा आणि रिवा सोलंकीचा विवाहसोहळा संपन्न झाला. त्यावेळी जाडेजाच्या वरातीदरम्यान त्याच्या नात्यातील कृपालसिंह जाडेजाने हवेत पिस्तुलाने सहा राऊंट फायर केले. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंडविधानाच्या कलम 336 नुसार तसंच आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement